मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Steve Smith : स्टीव्ह स्मिथनं ओलांडला १५००० धावांचा टप्पा; भारताला मागे टाकत ऑस्ट्रेलियाचा नवा विश्वविक्रम

Steve Smith : स्टीव्ह स्मिथनं ओलांडला १५००० धावांचा टप्पा; भारताला मागे टाकत ऑस्ट्रेलियाचा नवा विश्वविक्रम

Jun 29, 2023, 02:32 PM IST

  • Steve Smith Crossed 15 thousand runs mark : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्याच्या या कामगिरीमुळं ऑस्ट्रेलियाच्या नावावरही एक विश्वविक्रम नोंदवला गेला आहे.

Steve Smith

Steve Smith Crossed 15 thousand runs mark : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्याच्या या कामगिरीमुळं ऑस्ट्रेलियाच्या नावावरही एक विश्वविक्रम नोंदवला गेला आहे.

  • Steve Smith Crossed 15 thousand runs mark : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्याच्या या कामगिरीमुळं ऑस्ट्रेलियाच्या नावावरही एक विश्वविक्रम नोंदवला गेला आहे.

Steve Smith Crossed 15 thousand runs mark : इंग्लंडविरुद्धच्या सुरू असलेल्या दुसऱ्या अ‍ॅशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ १५ हजारी मनसबदार झाला आहे. वैयक्तिक ८४ धावांवर असताना त्यानं हा टप्पा ओलांडला आहे. स्मिथच्या या कामगिरीमुळं १५ हजार धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येकी ८ फलंदाजांनी १५ हजार धावांचा आकडा गाठला आहे. मात्र, स्टीव्ह स्मिथच्या या कामगिरीमुळं आता ऑस्ट्रेलियानं भारताला मागं टाकलं आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या यादीत रिकी पॉन्टिंग पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानं ५६० सामन्यांमध्ये २७,४८३ धावा केल्या आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रम आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानं आपल्या कारकिर्दीत खेळलेल्या ६६४ सामन्यांमध्ये ३४३५७ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचं शतक पूर्ण करण्याचा विश्वविक्रमही सचिनच्या नावावर आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ हजार धावा करणाऱ्या फलंदाजांची यादी

ऑस्ट्रेलिया : रिकी पाँटिंग, स्टीव्ह वॉ, अ‍ॅलन बॉर्डर, डेव्हिड वॉर्नर, मायकेल क्लार्क, मार्क वॉ, अ‍ॅडम गिलख्रिस्ट, मॅथ्यू हेडन, स्टीव्ह स्मिथ

भारत : सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड, सौरव गांगुली, एमएस धोनी, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, मोहम्मद अझरुद्दीन

श्रीलंका : कुमार संगकारा, महेला जयवर्धने, सनथ जयसूर्या, तिलकरत्ने दिलशान, अरविंद डी सिल्वा

वेस्ट इंडिज : ब्रायन लारा, शिवनारायण चंद्रपॉल, ख्रिस गेल, डेसमंड हेन्स, विव्ह रिचर्ड्स

दक्षिण आफ्रिका : जॅक कॅलिस, एबी डिव्हिलियर्स, हाशिम आमला, ग्रॅम स्मिथ

पाकिस्तान : इंझमाम-उल-हक, युनूस खान, जावेद मियांदाद, मोहम्मद युसूफ

न्यूझीलंड : रॉस टेलर, केन विल्यमसन, स्टीफन फ्लेमिंग

इंग्लंड : जो रूट, अ‍ॅलिस्टर कुक

बांगलादेश : तमिम इक्बाल

विभाग

पुढील बातम्या