मराठी बातम्या  /  क्रीडा  /  WWE : ट्रीपल एचच्या बायकोनं सौदीला विकली अमेरिकेतील लोकप्रिय रेसलिंग कंपनी

WWE : ट्रीपल एचच्या बायकोनं सौदीला विकली अमेरिकेतील लोकप्रिय रेसलिंग कंपनी

Jan 12, 2023, 12:40 PM IST

  • WWE Sold To Saudi Company: WWE या रेसलिंग कंपनीबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही कंपनी विन्स मॅकमोहन आणि स्टेफनी मॅकमोहन यांना विकल्याचे समोर आले आहे. सौदी अरेबियाच्या एका कंपनीने हा रेसलिंग इव्हेंट खरेदी केला आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही.

WWE Sold To Saudi

WWE Sold To Saudi Company: WWE या रेसलिंग कंपनीबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही कंपनी विन्स मॅकमोहन आणि स्टेफनी मॅकमोहन यांना विकल्याचे समोर आले आहे. सौदी अरेबियाच्या एका कंपनीने हा रेसलिंग इव्हेंट खरेदी केला आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही.

  • WWE Sold To Saudi Company: WWE या रेसलिंग कंपनीबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही कंपनी विन्स मॅकमोहन आणि स्टेफनी मॅकमोहन यांना विकल्याचे समोर आले आहे. सौदी अरेबियाच्या एका कंपनीने हा रेसलिंग इव्हेंट खरेदी केला आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही.

अमेरिकेतील लोकप्रिय प्रोफेशनल रेसलिंग इव्हेंट WWE बद्दल बुधवारी (११ जानेवारी) एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे, की WWE ला सौदी अरेबियाच्या पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंडाने खरेदी केले आहे. स्टेफनी मॅकमोहन आणि विन्स मॅकमोहन यांनी WWE च्या बोर्डाचा राजीनामादेखील दिला आहे. त्यामुळे ही चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

DAZN pro च्या एका रिपोर्टनुसार, विन्स आणि स्टेफनी यांच्याकडे WWE चे बहुतांश शेअर्स होते. हे शेअर्स आता त्यांनी विकले आहेत. वडील आणि मुलगी या दोघांनी या कंपनीला पब्लिक स्टॉक मार्केटमधून हटवले होते आणि एक खाजगी व्यवसाय म्हणून WWE ला पुढे सुरु ठेवले होते. मात्र, त्यानंतर आता या कंपनीची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही.

WWE ही जगातील सर्वात मोठी प्रोफेशनल रेसलिंग कंपनी मानली जाते, जी १९९९ पासून जगातील विविध देशांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. ही कंपनी मॅकमोहन कुटुंबाने तयार केली होती, पण नंतर ती सार्वजनिक करण्यात आली. आता विकण्यापूर्वी ती पुन्हा खाजगी करण्यात आली.

भारतातही प्रचंड लोकप्रिय

विन्स मॅकमोहन यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, जेव्हा त्यांच्यावर काही आरोप झाले होते. अशा परिस्थितीत त्यांची मुलगी स्टेफनी कंपनीची सर्व जबाबदारी सांभाळत होती. मात्र बुधवारी सकाळी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ती WWE च्या Co-CEO पदावर होती. तथापि, स्टेफनीचा पती आणि स्टार रेसलर ट्रिपल-एच अजूनही कंपनीशी संबंधित राहणार आहे.

दरम्यान, WWE भारतात देखील खूप लोकप्रिय आहे. शेकडो देशांमध्ये हा शो प्रसारित केला जातो. भारतातही अनेक WWE स्टार्स आहेत, जे जगभरात लोकप्रिय आहेत.

विभाग

पुढील बातम्या