मराठी बातम्या  /  क्रीडा  /  FIFA Womens World Cup Final : स्पेनने जिंकला महिला फिफा वर्ल्डकप, थरारक फायनलमध्ये इंग्लंडचा धुव्वा

FIFA Womens World Cup Final : स्पेनने जिंकला महिला फिफा वर्ल्डकप, थरारक फायनलमध्ये इंग्लंडचा धुव्वा

Aug 20, 2023, 07:38 PM IST

    • FIFA Womens World Cup Final : स्पेनने फिफा महिला विश्वचषक २२०३ चे विजेतेपद पटकावले आहे. स्पेनने फायनलमध्ये इंग्लंडचा १-० असा पराभव केला. स्पेनचा संघ प्रथमच विश्वविजेता ठरला आहे. दुसरीकडे पहिल्यांदाच विजेतेपद पटकावण्याचे इंग्लंडचे स्वप्न भंगले.
Spain won the FIFA Womens World Cup Final

FIFA Womens World Cup Final : स्पेनने फिफा महिला विश्वचषक २२०३ चे विजेतेपद पटकावले आहे. स्पेनने फायनलमध्ये इंग्लंडचा १-० असा पराभव केला. स्पेनचा संघ प्रथमच विश्वविजेता ठरला आहे. दुसरीकडे पहिल्यांदाच विजेतेपद पटकावण्याचे इंग्लंडचे स्वप्न भंगले.

    • FIFA Womens World Cup Final : स्पेनने फिफा महिला विश्वचषक २२०३ चे विजेतेपद पटकावले आहे. स्पेनने फायनलमध्ये इंग्लंडचा १-० असा पराभव केला. स्पेनचा संघ प्रथमच विश्वविजेता ठरला आहे. दुसरीकडे पहिल्यांदाच विजेतेपद पटकावण्याचे इंग्लंडचे स्वप्न भंगले.

Spain won the FIFA Womens World Cup Final : स्पेनने महिला फिफा विश्वचषक २०२३ चे विजेतेपद पटकावले आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात स्पेनने इंग्लंडचा १-० असा पराभव केला.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

 स्पेनची कर्णधार ओल्गा कार्मोना हिने २९व्या मिनिटाला सामन्यातील एकमेव गोल करून आपल्या संघाला चॅम्पियन बनवले. स्पॅनिश संघ प्रथमच महिला फिफा विश्वचषक चॅम्पियन बनला आहे. हा संघ प्रथमच या स्पर्धेचा अंतिम सामना खेळत होता आणि पहिल्याच अंतिम फेरीत त्यांनी इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाचा पराभव केला. तथापि, इंग्लंडचीदेखील पहिलीच विश्वचषक फायनल होती.

महिला फिफा विश्वचषक जिंकणारा स्पेनचा संघ पाचवा संघ ठरला आहे. याआधी अमेरिकेने ४ वेळा, जर्मनीने दोनदा, नॉर्वे आणि जपानने प्रत्येकी एकदा महिला फिफा विश्वचषक विजेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर इंग्लंड संघाचीही हीच सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी २०१५ मध्ये इंग्लंडने तिसरा क्रमांक पटकावला होता.

स्पेनच्या महिला संघाने फिफा विश्वचषक विजेतेपदाच्या बाबतीत त्यांच्याच देशाच्या पुरुष संघाची बरोबरी केली आहे. स्पेनच्या पुरुष संघानेही केवळ एकदाच फिफा विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. २०१० मध्ये त्यांनी हे केले होते. यानंतर आता तब्बल १३ वर्षांनंतर स्पेनचा महिला संघही चॅम्पियन बनला आहे.

विभाग

पुढील बातम्या