मराठी बातम्या  /  क्रीडा  /  INDvsSA: क्विंटन डी कॉकला आज सुवर्ण संधी! धोनीच्या स्पेशल क्लबमध्ये सामील होणार?

INDvsSA: क्विंटन डी कॉकला आज सुवर्ण संधी! धोनीच्या स्पेशल क्लबमध्ये सामील होणार?

Jun 12, 2022, 04:47 PM IST

    • आफ्रिकेचा संघ ५ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे.
Quinton de Kock (hindustan times)

आफ्रिकेचा संघ ५ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे.

    • आफ्रिकेचा संघ ५ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज रविवारी कटक येथील बाराबती स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात पाहुण्या संघाचा यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकच्या नावे एक मोठा विक्रम होऊ शकतो. डी कॉकने आज भारताविरुद्ध विकेटच्या मागे झेल पकडला तर तो टी-२० क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हणून ५० झेल पूर्ण करेल.

ट्रेंडिंग न्यूज

Para Championship 2024 : मजुराच्या लेकीनं जपानमध्ये रचला इतिहास, आई-वडिलांना टोमणे मारणाऱ्यांना लगावली सणसणीत चपराक

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

जर त्याने आज एक झेल घेतला तर अशी कामगिरी करणारा तो जगातील केवळ दुसराच विकेटकीपर ठरणार आहे. या यादीत भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी हा पहिल्या क्रमांकावर आहे.

धोनीने ९८ सामन्यांमध्ये विकेटमागे ९१ बळी घेतले आहेत, ज्यामध्ये ५७ झेल तर ३४ स्टंम्पिंगचा समावेश आहे. दुसरीकडे, क्विंटन डी कॉकने आतापर्यंत टी-२० मध्ये विकेटच्या मागे ६४ खेळाडूंना बाद केले आहे, ज्यात ४९ झेल आणि १५ स्टंम्पिंगचा समावेश आहे.

महेंद्रसिंग धोनी - ५७

क्विंटन डी कॉक - ४९

दिनेश रामदिन - ४३

मुशफिकर रहीम - ३२

कामरान अकमल - २८

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने दिल्लीत खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवला होता. आफ्रिकेचा संघ ५ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. दक्षिण आफ्रिकेने दिल्लीत डेव्हिड मिलर आणि रासी व्हॅन डर डुसेन यांच्या झंझावाती खेळीच्या बळावर २१२ धावांचे लक्ष्य सहज गाठले होते. अशात कटकमध्ये खेळवण्यात येणारा दुसरा सामना जिंकून टीम इंडिया मालिकेत बरोबरी साधण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

पुढील बातम्या