मराठी बातम्या  /  क्रीडा  /  South Africa Team: भारत दौरा आणि T20 वर्ल्डकपसाठी आफ्रिकन संघ जाहीर, 'हा' स्टार खेळाडू संघाबाहेर

South Africa Team: भारत दौरा आणि T20 वर्ल्डकपसाठी आफ्रिकन संघ जाहीर, 'हा' स्टार खेळाडू संघाबाहेर

Sep 06, 2022, 04:35 PM IST

    • South Africa Team, T20 World Cup 2022: आफ्रिकन संघात यष्टिरक्षक क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, एडन मार्कराम, एनरिक नॉर्खिया, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडीसारखे स्टार खेळाडू आहेत. तर रुसी व्हॅन डर डुसेनला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.
South Africa Team

South Africa Team, T20 World Cup 2022: आफ्रिकन संघात यष्टिरक्षक क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, एडन मार्कराम, एनरिक नॉर्खिया, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडीसारखे स्टार खेळाडू आहेत. तर रुसी व्हॅन डर डुसेनला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.

    • South Africa Team, T20 World Cup 2022: आफ्रिकन संघात यष्टिरक्षक क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, एडन मार्कराम, एनरिक नॉर्खिया, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडीसारखे स्टार खेळाडू आहेत. तर रुसी व्हॅन डर डुसेनला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.

दक्षिण आफ्रिकेने यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी १५ जणांचा संघ जाहीर केला आहे. यासोबतच तीन खेळाडूंनाही राखीव ठेवण्यात आले आहे. संघाचे कर्णधारपद टेंम्बा बावुमाकडे असेल.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

या आफ्रिकन संघात यष्टिरक्षक क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, एडन मार्कराम, एनरिक नॉर्खिया, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडीसारखे स्टार खेळाडू आहेत. मात्र या संघात एका स्टार खेळाडूची उणीव आहे.

अव्वल फळीतील फलंदाज रुसी व्हॅन डर डुसेनला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेने नुकतीच इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच घरच्या मैदानावर कसोटी मालिका खेळली. याच मालिकेतील दुसऱ्या कसोटीदरम्यान डुसेनला दुखापत झाली होती. क्षेत्ररक्षणादरम्यान त्याच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती, जी अद्याप बरी झालेली नाही.

विश्वचषकात आफ्रिकेचा संघ भारताच्या गटात

यंदाचा T20 विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळवला जाणार आहे, जो १६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तर सुपर-१२ फेरी २२ ऑक्टोबरपासून सुरू होईल. तर टीम इंडिया २३ ऑक्टोबरला पाकिस्तानशी भिडणार आहे. T20 विश्वचषक २०२२ मध्ये, दक्षिण आफ्रिकेला टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश आणि दोन क्वालिफायर संघांसह गट-२ मध्ये ठेवण्यात आले आहे.

T20 विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ

दक्षिण आफ्रिका संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, वेन पारनेल, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्खिया, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, रिले रोश, तबरेझ शम्सी आणि ट्रिस्टन स्टब्स.

राखीव खेळाडू: जॉर्न फोर्टुइन, मार्को जॅन्सेन आणि अँडिले फेहलुकवायो.

पुढील बातम्या