मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sourav Ganguly Security : सौरव गांगुलीला Z सुरक्षा, अचानक सुरक्षा वाढवण्याचं कारण काय? जाणून घ्या

Sourav Ganguly Security : सौरव गांगुलीला Z सुरक्षा, अचानक सुरक्षा वाढवण्याचं कारण काय? जाणून घ्या

May 17, 2023, 05:52 PM IST

    • Sourav ganguly Security : भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्याची सुरक्षा आता झेड श्रेणीत वाढवण्यात आली आहे. गांगुली सध्या आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचा 'क्रिकेट संचालक' आहे.
Sourav ganguly z category Security

Sourav ganguly Security : भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्याची सुरक्षा आता झेड श्रेणीत वाढवण्यात आली आहे. गांगुली सध्या आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचा 'क्रिकेट संचालक' आहे.

    • Sourav ganguly Security : भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्याची सुरक्षा आता झेड श्रेणीत वाढवण्यात आली आहे. गांगुली सध्या आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचा 'क्रिकेट संचालक' आहे.

Sourav ganguly z category Security : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीच्या (Sourav ganguly z category Security) सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गांगुलीला आता झेड श्रेणीची सुरक्षा मिळणार आहे. पश्चिम बंगाल सरकारने सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याला एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. सौरव गांगुली आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघात 'क्रिकेट संचालका'च्या भूमिकेत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

सुरक्षा वाढवण्याचं कारण काय?

सौरव गांगुलीचा Y श्रेणीच्या सुरक्षेचा कार्यकाळ मंगळवारी (१६ मे) संपत होता. त्यानंतरच त्याची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिकाऱ्याने सांगितले, की VVIP चा सुरक्षेचा कालावधी संपताच प्रोटोकॉल अंतर्गत त्याचा आढावा घेतला जातो, त्यानंतरच गांगुलीची सुरक्षा झेड श्रेणीत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंगळवारी पश्चिम बंगाल सचिवालयातील तीन प्रतिनिधी सौरव गांगुलीच्या बेहाला, कोलकाता येथील कार्यालयात पोहोचले. त्यांनी कोलकाता पोलिस मुख्यालय आणि स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतरच हा निर्णय झाला.

या अधिकाऱ्याने सांगितले की, सौरव गांगुली सध्या दिल्ली कॅपिटल्स संघासोबत प्रवास करत आहे. २१ मे रोजी तो कोलकात्यात येणार आहे. त्या दिवसापासून त्याला झेड श्रेणीची सुरक्षा मिळण्यास सुरुवात होईल.

अशी असेल सुरक्षा

झेड श्रेणीची सुरक्षा मिळाल्यानंतर सौरव गांगुलीच्या सुरक्षेसाठी ८-१० पोलीस अधिकारी तैनात केले जातील. त्याचवेळी वाय श्रेणीच्या सुरक्षेअंतर्गत त्याला स्पेशल ब्रँचचे तीन पोलीस मिळाले होते, याशिवाय कोलकाता येथील बेहाला येथील त्याच्या घरी स्पेशल ब्रँच तीन सुरक्षा अधिकारी तैनात होते.

पुढील बातम्या