मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rishabh Pant : मी पंतच्या संपर्कात… त्याला बरे होण्यासाठी 'इतकी' वर्ष लागतील, गांगुली स्पष्टच बोलला

Rishabh Pant : मी पंतच्या संपर्कात… त्याला बरे होण्यासाठी 'इतकी' वर्ष लागतील, गांगुली स्पष्टच बोलला

Feb 27, 2023, 08:01 PM IST

    • Rishabh Pant health Update : ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानावर कधी परतणार? हा प्रश्न सर्वांच्या मनात कायम आहे. आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
Rishabh Pant health Update

Rishabh Pant health Update : ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानावर कधी परतणार? हा प्रश्न सर्वांच्या मनात कायम आहे. आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

    • Rishabh Pant health Update : ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानावर कधी परतणार? हा प्रश्न सर्वांच्या मनात कायम आहे. आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

Sourav Ganguly On Rishabh Pant : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत अपघातात गंभीर जखमी झाला होता. सध्या तो क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे, ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानात कधी परतणार? हा प्रश्न कायम आहे. मात्र, आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानात कधी परतणार हे दादाने सांगितले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

ऋषभ पंत मैदानात कधी परतणार?

ऋषभ पंतला क्रिकेटच्या मैदानात परतण्यासाठी जवळपास २ वर्षे लागतील, असे सौरव गांगुलीने म्हणणे आहे. तो म्हणाला की मी ऋषभ पंतशी अनेकदा बोललो आहे. त्याच्यासाठी हा कठीण काळ आहे. त्या अपघातानंतर ऋषभ पंतवर शस्त्रक्रिया झाली, माझ्या शुभेच्छा त्याच्यासोबत आहेत. सोबतच गांगुली म्हणाला की ऋषभ पंतला मैदानात परतण्यासाठी १ वर्ष लागेल किंवा त्याला २ वर्षेही लागू शकतील, पण मला खात्री आहे की तो पुन्हा नक्की मैदानात उतरेल".

वास्तविक, सौरव गांगुलीने दिल्ली कॅपिटल्सचा डायरेक्टर म्हणून म्हणून काम केले आहे. बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्यानंतर त्याने दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक पद सोडले होते. मात्र, आता लवकरच तो पुन्हा एकदा या जबाबदारीत दिसणार आहेत.

दिल्ली कॅपिटल्सने केले शिबिराचे आयोजन

अलीकडेच दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल २०२३ पूर्वी कोलकाता येथे एका शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात पृथ्वी शॉ व्यतिरिक्त इशांत शर्मा, चेतन साकारिया, मनीष पांडे यांच्यासह अनेक देशांतर्गत क्रिकेटपटू सहभागी झाले होते. आयपीएल ३१ मार्चपासून सुरू होणार आहे.

पुढील बातम्या