मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Maharashtra Kesari 2023 : सिकंदर शेख यंदाचा महाराष्ट्र केसरी! गतविजेता शिवराज राक्षेला दाखवलं आस्मान

Maharashtra Kesari 2023 : सिकंदर शेख यंदाचा महाराष्ट्र केसरी! गतविजेता शिवराज राक्षेला दाखवलं आस्मान

Nov 10, 2023, 06:55 PM IST

    • sikandar shaikh Maharashtra Kesari : कुस्तीपटू सिंकदर शेख यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. त्याने शिवराक्ष राक्षेचा पराभव करत मानाची गदा जिंकली.
sikandar shaikh Maharashtra Kesari

sikandar shaikh Maharashtra Kesari : कुस्तीपटू सिंकदर शेख यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. त्याने शिवराक्ष राक्षेचा पराभव करत मानाची गदा जिंकली.

    • sikandar shaikh Maharashtra Kesari : कुस्तीपटू सिंकदर शेख यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. त्याने शिवराक्ष राक्षेचा पराभव करत मानाची गदा जिंकली.

sikandar shaikh Maharashtra Kesari 2023 : सिंकदर शेखने महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकली आहे. महाराष्ट्र केसरीच्या फायनलमध्ये सिकंदरने गेल्या वर्षीचा महाराष्ट्र केसरी विजेता शिवराज राक्षे याचा पराभव केला.  

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

सिंकदरने गतविजेता शिवराज राक्षे याला अवघ्या दहा सेकंदात चीत केले. त्याने शिवराज याच्याविरोधात अवघ्या ५ सेकंदात झोळी डाव टाकून सामन्याचा निकाल लावला आणि ६६ वा महाराष्ट्र केसरी बनण्याचा मान मिळवला.

यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा  पुणे जिल्ह्यातील लोणीकंद - फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस स्कूलच्या मैदानावर पार पडली.

सिंकदरने संदीप मोटचा पराभव करत फायनल गाठली

यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्या फेरीत गादी विभागात शिवराज राक्षेने हर्षद कोकाटेचा पराभव करून फायनल गाठली. त्याचे लक्ष्य दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी बनण्यावर होते. पण सिकंदरने ते स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही.

तर माती विभागात सिकंदर शेखने संदीप मोटेवर १०-० असा एकतर्फी विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला होता.

सिकंदरचा मागच्या वर्षी पराभव झाला होता

सिकंदर शेख याचा मागच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पराभव झाला होता. पण यंदा मात्र त्याने संधी गमावली नाही.  शिवराज राक्षे याने मागील वर्षी महेंद्र गायकवाड याचा पराभव करत पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली होती. त्याचे सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही.

गेल्या वर्षी सिकंदरचा सेमी फायनलमध्ये महेंद्र गायकवाड याच्याकडून पराभव झाला होता. पण सेमी फायनलमध्ये महेंद्र गायकवाडकडून पराभूत झाल्यानंतर सिकंदर शेख हा सोशल मीडियावर हिरो ठरला. 

सिकंदरने वडिलांचे स्वप्न पूर्ण केले

सिकंदर मुळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातला असून त्याच्या घरात आजोबापासूंनचा कुस्तीचा वारसा आहे. त्याचे वडीलही कुस्ती खेळायचे. पण गरिबीमुळे त्यांना हमालीचे काम करावे लागत होते. सिकंदर अलीकडेच भारतीय लष्करात भरती झाला आहे. तो सैन्यदलाकडूनही खेळतो. आपला मुलगा मोठा मल्ल बनावा ही वडीलांची इच्छा त्याने पुर्ण केली आहे.

सिंकदरने आतापर्यंत देशभरात अनेक कुस्त्या लढून बक्षिसे जिंकली आहेत. यामध्ये सिकंदरने एक महिन्द्रा थार चारचाकी, एक जॉन डिअर ट्रॅक्टर, ४  अल्टो कार, २४ बुलेट, ६ टिव्हीएस, ६ सप्लेंडर तर तब्बल ४० चांदीच्या गदा जिंकल्या आहेत.

पुढील बातम्या