मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Viral News: शुभमन गिल- सारा तेंडुलकर रिलेशनशिपमध्ये असल्याच्या दाव्याला खतपाणी; यंदा कुठे दिसले? बघा

Viral News: शुभमन गिल- सारा तेंडुलकर रिलेशनशिपमध्ये असल्याच्या दाव्याला खतपाणी; यंदा कुठे दिसले? बघा

Nov 01, 2023, 03:16 PM IST

    • Shubman Gill and Sara Tendulkar: जिओ वर्ल्ड प्लाझाचे मंगळवारी उद्घाटन झाले. यावेळी सारा आणि शुभमन येथे आले होते.
Shubman Gill and Sara Tendulkar

Shubman Gill and Sara Tendulkar: जिओ वर्ल्ड प्लाझाचे मंगळवारी उद्घाटन झाले. यावेळी सारा आणि शुभमन येथे आले होते.

    • Shubman Gill and Sara Tendulkar: जिओ वर्ल्ड प्लाझाचे मंगळवारी उद्घाटन झाले. यावेळी सारा आणि शुभमन येथे आले होते.

Shubman Gill and Sara Tendulkar Dating News: भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिल आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची कन्या सारा तेंडुलकर रिलेशनशिपमध्ये असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. नुकताच दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात दोघेही जिओ वर्ल्ड प्लाझामधून बाहेर पडताना दिसत आहेत. सुरुवातीला शुभमन गिल जिओ वर्ल्ड प्लाझामधून बाहेर पडतो. यावेळी त्याच्यामागे काही अंतरावर सारा तेंडुलकर उभा असल्याचे दिसत आहे. यामुळे हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचा चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

शुभमन आणि सारा यांच्या डेटिंगच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. त्यांच्या नात्याचा दावा करणारे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, अद्याप या दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत काहीच बोलले नाही. म्हणजेच हे दोघांमध्ये प्रेमसंबंध आहेत की दोघे फक्त चांगले मित्र आहेत, हे अजूनही कळू शकलेले नाही.

नुकताच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शुभमन आणि सारा मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड प्लाझाच्या बाहेर दिसले. जिओ वर्ल्ड प्लाझाचे मंगळवारी उद्घाटन झाले. यावेळी सारा आणि शुभमन येथे आले होते, जिथे शुभमन कॅज्युअल कपड्यात आणि सारा लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली.

याआधी सारा तेंडुलकर नुकतीच वर्ल्ड कप मॅचदरम्यान स्टेडियममध्ये दिसली होती. शुभमनला चीअर करण्यासाठी सारा स्टेडियम आली होती, असी सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. याआधीही काही प्रसंगी असे फोटो समोर आले आहेत, ज्यामुळे हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

विभाग

पुढील बातम्या