मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shooting world cup 2022: भारताच्या अर्जुन बबुताची कमाल, सुवर्णपदकावर कोरलं नाव

Shooting world cup 2022: भारताच्या अर्जुन बबुताची कमाल, सुवर्णपदकावर कोरलं नाव

Jul 11, 2022, 03:52 PM IST

    • ISSF World Cup 2022: अर्जुन बबुताने (arjun babuta) आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. १० मीटर एअर रायफल स्पर्धेत त्याने ही कामगिरी केली. तर स्पर्धेतील दुसरा भारतीय नेमबाज पार्थ माखिजा २५८.१ गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला.
arjun babuta

ISSF World Cup 2022: अर्जुन बबुताने (arjun babuta) आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. १० मीटर एअर रायफल स्पर्धेत त्याने ही कामगिरी केली. तर स्पर्धेतील दुसरा भारतीय नेमबाज पार्थ माखिजा २५८.१ गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला.

    • ISSF World Cup 2022: अर्जुन बबुताने (arjun babuta) आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. १० मीटर एअर रायफल स्पर्धेत त्याने ही कामगिरी केली. तर स्पर्धेतील दुसरा भारतीय नेमबाज पार्थ माखिजा २५८.१ गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला.

Arjun Babuta wins Gold Medal: भारताचा युवा नेमबाज अर्जुन बबुता याने ISSF विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने सोमवारी चांगवॉन येथे ISSF विश्वचषक स्पर्धेतील पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात देशासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले. सुवर्णपदकाच्या लढतीत अर्जुनने टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या लुकास कोझेन्स्कीचा १७-९ असा पराभव केला.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

पंजाबचा २३ वर्षीय अर्जुन २०१६ पासून भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. वरिष्ठ संघात अर्जुनचे हे पहिले सुवर्णपदक आहे. अझरबैजानच्या गबाला येथे २०१६ च्या ज्युनियर वर्ल्ड कपमध्येही त्याने सुवर्णपदक जिंकले होते.

या स्पर्धेत सहभागी झालेला आणखी एक भारतीय नेमबाज पार्थ माखिजा २५८.१ गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला. तर इस्रायलच्या ३३ वर्षीय सर्गेई रिक्टरने २५९.९ गुणांसह तिसरे स्थान पटकावले.

महिला खेळाडूंची निराशाजनक कामगिरी-

महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात भारतीय महिला खेळाडूंना विशेष कामगिरी करता आली नाही. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकाही भारतीय महिला खेळाडूला स्थान मिळवता आले नाही. २१ वर्षीय मेहुल घोष ११ व्या स्थानावर राहिली. तिने ६२८.७ गुण मिळवले. त्याचवेळी रमिताला ६२७.४ गुणांसह १७ व्या स्थानावर समाधाना मानावे लागले. तर माजी नंबर वन खेळाडू इलावेनिल वालारिवनने ६२६.३ गुण मिळवत २४ वे स्थान पटकावले.

ट्रॅप आणि एअर पिस्टल इव्हेंटमध्ये भारतीय खेळाडू सोमवारपासून आपल्या स्पर्धेला सुरुवात करतील. चांगवॉन विश्वचषकासाठी भारताने ३२ खेळाडूंचा ताफा पाठवला आहे. या स्पर्धेत ४४ देशांतील ४३२ हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत.

विभाग

पुढील बातम्या