मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shoaib Akhtar-Virat Kohli : शोएब अख्तर विराटचं इतकं कौतुक का करतो? खरं कारण आलं समोर

Shoaib Akhtar-Virat Kohli : शोएब अख्तर विराटचं इतकं कौतुक का करतो? खरं कारण आलं समोर

Mar 05, 2023, 02:58 PM IST

    • Shoaib Akhtar on Virat Kohli : कोहलीच्या फलंदाजीचे अनेक चाहते आहेत. यात पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचाही समावेश आहे. मात्र, आता त्याने एक खुलासा केला आहे. शोएब अख्तरने सांगितले आहे, की तो नेहमी विराट कोहलीबद्दल इतके का बोलतो आणि त्याचे इतके कौतुक का करतो'.
Shoaib Akhtar on Virat Kohli

Shoaib Akhtar on Virat Kohli : कोहलीच्या फलंदाजीचे अनेक चाहते आहेत. यात पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचाही समावेश आहे. मात्र, आता त्याने एक खुलासा केला आहे. शोएब अख्तरने सांगितले आहे, की तो नेहमी विराट कोहलीबद्दल इतके का बोलतो आणि त्याचे इतके कौतुक का करतो'.

    • Shoaib Akhtar on Virat Kohli : कोहलीच्या फलंदाजीचे अनेक चाहते आहेत. यात पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचाही समावेश आहे. मात्र, आता त्याने एक खुलासा केला आहे. शोएब अख्तरने सांगितले आहे, की तो नेहमी विराट कोहलीबद्दल इतके का बोलतो आणि त्याचे इतके कौतुक का करतो'.

भारताचा विराट कोहली हा त्याच्या पिढीतील महान फलंदाजांपैकी एक मानला जातो. विराट कोहलीचा गेल्या दोन-तीन वर्षांत घसरलेला फॉर्म हा क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय बनला होता. मात्र, गेल्या वर्षी आशिया चषक टी-२० मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावून त्याने शतकांचा दुष्काळ संपवला. 

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

कोहलीने फॉर्ममध्ये परतण्यापूर्वी मानसिक फिटनेसवर काम केले. यासाठी त्याने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये क्रिकेटमधून एक महिन्याचा ब्रेकदेखील घेतला होता. 

कोहलीच्या फलंदाजीचे अनेक चाहते आहेत. यात पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचाही समावेश आहे. मात्र, आता त्याने एक खुलासा केला आहे. शोएब अख्तरने सांगितले आहे, की तो नेहमी विराट कोहलीबद्दल इतके का बोलतो आणि त्याचे इतके कौतुक का करतो'. 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना शोएब म्हणाला की, “माझा विश्वास आहे की सचिन तेंडुलकर जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे, पण एक कर्णधार म्हणून तो फ्लॉप होता. त्याने स्वतःच कर्णधारपद सोडले. मी माझ्या एका मित्रासोबत विराट कोहलीबद्दल बोलत होतो आणि आम्ही दोघेही त्यावरच चर्चा करत होतो. मी म्हणालो की विराट कुठेतरी हरवला आहे आणि जेव्हा तो त्याचे मन शांत करेल, तेव्हा तो पुन्हा धावा करायला सुरुवात करेल. जेव्हा तो वर्ल्डकपपूर्वी एक महिन्याचा ब्रेक घेऊन टेन्शन फ्री होऊन परत आला तेव्हा त्याने टी-20 विश्वचषकात जबदरस्त कामगिरी केली होती”.

शोएब पुढे म्हणाला की, "तुम्हाला हे देखील पाहावे लागेल की कोहलीची जवळपास ४० शतके धावांचा पाठलाग करताना झाली आहेत. लोक म्हणतात की तू विराटची खूप स्तुती करतोस, मी म्हणतो का करू नये? एक काळ असा होता की विराटच्या शतकांमुळे भारत जिंकायचा. कोहली सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघाचा भाग आहे. मात्र, हा स्टार फलंदाज आतापर्यंत तीन कसोटी सामन्यांमध्ये मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला आहे.

पुढील बातम्या