मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Jasprit Bumrah Bowling Action: शोएब अख्तरची भविष्यवाणी खरी ठरली, बुमराहसोबत नेमकं तसंच घडलं

Jasprit Bumrah Bowling Action: शोएब अख्तरची भविष्यवाणी खरी ठरली, बुमराहसोबत नेमकं तसंच घडलं

Sep 30, 2022, 05:18 PM IST

    • Shoaib akhtar on Jasprit Bumrah Bowling Action: बुमराहने यावर्षी फारसे क्रिकेट खेळलेले नाही. २०२२ मध्ये आतापर्यंत बुमराहने ५ कसोटी, ५ एकदिवसीय आणि ५ टी-20 सामने खेळले आहेत. त्याने बऱ्याच दिवसांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतून पुनरागमन केले होते. बुमराह वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर शोएब अख्तरचा एक जुना व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.
shoaib akhtar

Shoaib akhtar on Jasprit Bumrah Bowling Action: बुमराहने यावर्षी फारसे क्रिकेट खेळलेले नाही. २०२२ मध्ये आतापर्यंत बुमराहने ५ कसोटी, ५ एकदिवसीय आणि ५ टी-20 सामने खेळले आहेत. त्याने बऱ्याच दिवसांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतून पुनरागमन केले होते. बुमराह वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर शोएब अख्तरचा एक जुना व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

    • Shoaib akhtar on Jasprit Bumrah Bowling Action: बुमराहने यावर्षी फारसे क्रिकेट खेळलेले नाही. २०२२ मध्ये आतापर्यंत बुमराहने ५ कसोटी, ५ एकदिवसीय आणि ५ टी-20 सामने खेळले आहेत. त्याने बऱ्याच दिवसांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतून पुनरागमन केले होते. बुमराह वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर शोएब अख्तरचा एक जुना व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

रवींद्र जडेजानंतर आता जसप्रीत बुमराहहीदुखापतीमुळे टी-२० विश्वचषकातून बाहेर झाला आहे. दोन्ही खेळाडू भारतासाठी मॅच विनर आहेत. तेच बाहेर पडल्याने वर्ल्डकप जिंकण्याच्या भारतीयांच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला आहे. बुमराहच्या पाठीच्या दुखापतीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. आशिया चषकापूर्वीही बुमराह पाठीच्या दुखापतीने त्रस्त होता. त्यामुळेच तो आशिया चषकदेखील खेळू शकला नव्हता. बुमराहला आता किमान ४ ते ६ महिने क्रिेकेटच्या मैदानापासून दूर राहावे लागू शकते.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

विशेष म्हणजे, बुमराहने यावर्षी फारसे क्रिकेट खेळलेले नाही. २०२२ मध्ये आतापर्यंत बुमराहने ५ कसोटी, ५ एकदिवसीय आणि ५ टी-20 सामने खेळले आहेत. त्याने बऱ्याच दिवसांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतून पुनरागमन केले होते.

बुमराहच्या दुखापतीची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. सोबतच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा एक जुना व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शोएब अख्तर बुमराहची अनोखी बॉलिंग अॅक्शन त्याच्या कारकिर्दीला कशी धोका निर्माण करू शकते याबद्दल बोलत आहे.

बुमराहची गोलंदाजी फ्रंटल अॅक्शनवर आधारित

जवळपास एक वर्षापूर्वी एका टीव्ही चॅनलवर बोलताना शोएब म्हणाला होता की, "बुमराहची बॉलिंग फ्रंटल अॅक्शनवर आधारित आहे. चेंडू फेकताना तो वेग निर्माण करण्यासाठी त्याच्या पाठीचा आणि खांद्याचा वापर करतो. तर आम्ही गोलंदाजी करताना साइड-ऑन असायचो आणि त्यामुळे पाठीवर जास्त दडपण येत नाही. बुमराहची फ्रंट-ऑन अॅक्शनमुळे त्याच्या पाठीवर जास्त दबाव येतो.

<p>ian bishop and shane bond</p>

शोएबने यावेळी वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज इयान बिशप आणि न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बाँड यांचे उदाहरण देत म्हटले की, भारत बुमराहला तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळवू शकत नाही. तसेच, अख्तर म्हणाला, "मी बघितले आहे की बिशप त्याच्या पाठीशी झुंजत होता, शेन बॉन्डची देखील अशीच परिस्थिती होती आणि दोघांचीही फ्रंटल अॅक्शन होती.

बुमराह सर्व फॉरमॅट खेळू शकणार नाही, मॅनेजमेंटची गरज

बुमराहला आता विचार करायला हवा. कारण तो सर्व फॉरमॅट आता खेळू शकणार नाही. त्याला मॅनेजमेंटची गरज आहे. जर तुम्ही बुमराह प्रत्येक सामन्यात खेळवले तर एका वर्षात तो पूर्णपणे तुटून जाईल. त्याला ५ पैकी ३ खेळवा आणि मग त्याला थोडीशी विश्रांती द्या. बुमराहला जास्त दिवस खेळवायचे असेल तर ही एक गोष्ट सांभाळावी लागेल".

मायकल होल्डिंगनंही सांगितलं होतं

चाहते हा व्हिडिओ खूप शेअर करत आहेत. तसेच, बुमराहच्या दुखापतीचा अचूक अंदाज वर्तवल्याबद्दल चाहत्यांनी अख्तरचे कौतुक केले. विशेष म्हणजे अख्तर हाच एकमेव नव्हता ज्याने बुमराहच्या लाँगटर्म करिअरवर शंका व्यक्त केली होती. वेस्ट इंडिजचा महान वेगवान गोलंदाज मायकेल होल्डिंगनेही सांगितले होते की, बुमराह ज्या प्रकारे गोलंदाजी करतो, त्यामुळे त्याला नेहमीच दुखापतीचा धोका असेल.

पुढील बातम्या