मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shikhar Dhawan : टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये इगोची समस्या, शिखर धवनचा मोठा खुलासा

Shikhar Dhawan : टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये इगोची समस्या, शिखर धवनचा मोठा खुलासा

Mar 27, 2023, 01:49 PM IST

  • Shikhar Dhawan On Team Indias Player Ego : शिखर धवनने टीम इंडियाच्या खेळाडूंमधील अहंकाराच्या समस्येबाबत सांगितली आहे. तो म्हणाला की, जेव्हा आपण दीर्घकाळ एकत्र राहतो तेव्हा अहंकार असणे सामान्य आहे.

Shikhar Dhawan On Team Indias Player Ego

Shikhar Dhawan On Team Indias Player Ego : शिखर धवनने टीम इंडियाच्या खेळाडूंमधील अहंकाराच्या समस्येबाबत सांगितली आहे. तो म्हणाला की, जेव्हा आपण दीर्घकाळ एकत्र राहतो तेव्हा अहंकार असणे सामान्य आहे.

  • Shikhar Dhawan On Team Indias Player Ego : शिखर धवनने टीम इंडियाच्या खेळाडूंमधील अहंकाराच्या समस्येबाबत सांगितली आहे. तो म्हणाला की, जेव्हा आपण दीर्घकाळ एकत्र राहतो तेव्हा अहंकार असणे सामान्य आहे.

Shikhar Dhawan On Team Indias Player Ego : शिखर धवन सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेपासून त्याला वनडे संघात स्थान मिळालेले नाही. २०२३ च्या विश्वचषकात त्याची निवड होणे कठीण आहे. नुकतेच शिखर धवनने भारतीय संघातील खेळाडूंबद्दल मोठा खुलासा केला आहे. एका मुलाखतीदरम्यान त्याने भारतीय संघातील खेळाडूंना इगो असण्याबाबतचा खुलासा केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

अहंकार असणे सामान्य गोष्ट

एका चॅनलशी संवाद साधताना शिखर धवनला टीम इंडियातील खेळाडूंच्या अहंकाराबद्दल विचारण्यात आले. यावर उत्तर देताना धवन म्हणाला की, 'अहंकाराचा संघर्ष ही एक मानवी गोष्ट आहे'. शिखर धवनच्या मते, 'अहंकार असणे ही अतिशय मानवी आणि सामान्य गोष्ट आहे. तो म्हणाला की, “आम्ही जवळपास २२० दिवस एकत्र राहतो. कधीकधी लोकांमध्ये गैरसमज होतात. हे आमच्या खेळाडूंच्या बाबतीतही घडते. मी रोहित शर्मा किंवा विराट कोहलीबद्दल बोलत नाही. अहंकार असणे ही एक सामान्य गोष्ट आहे”.

दरम्यान, शिखर धवनने रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे नाव घेण्यास नकार दिला. तो म्हणाला, 'जेव्हा लोक एकमेकांसोबत इतका वेळ घालवतात तेव्हा अशा गोष्टी घडणे सामान्य आहे'. धवन पुढे म्हणाला, 'आमच्याकडे ४० लोकांची टीम आहे ज्यात सपोर्ट स्टाफ आणि मॅनेजरचाही समावेश आहे. जेव्हा तुम्ही कोणासोबतही आनंदी नसाल तेव्हा काही भांडण आणि मतभेद होऊ शकतात. असे घडत असते, असे घडू शकते. जेव्हा गोष्टी चांगल्या होतात तेव्हा प्रेम देखील वाढते".

मी देखील शुबमनला संधी दिली असती

यादरम्यान शिखर धवनने एकदिवसीय संघातील आपले स्थान गमावल्याबद्दलही मत व्यक्त केले. तो म्हणाला की, 'शुबमन गिल हा त्याच्यापेक्षा अधिक पात्र खेळाडू आहे'. धवनच्या म्हणण्यानुसार, 'शुबमन गिल ज्या पद्धतीने खेळत आहे त्याच्यावर माझा विश्वास आहे. ज्या प्रकारे त्याने कसोटी आणि टी-20 मध्ये चांगली कामगिरी केली आहे, ते पाहता मी निवडकर्ता असतो तर मीदेखील शुभमनला संधी दिली असती. शिखरच्या आधी मी शुभमनला संघात निवडले असते'.

पुढील बातम्या