मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs SA Video: बोलो तारा रा रा… मालिका जिंकल्यानंतर गब्बर & कंपनीचा जबरदस्त डान्स

IND vs SA Video: बोलो तारा रा रा… मालिका जिंकल्यानंतर गब्बर & कंपनीचा जबरदस्त डान्स

Oct 11, 2022, 10:31 PM IST

    • shikhar dhawan dance with indian players: युवा टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका जिंकली. यानंतर टीमने नाचून आनंद साजरा केला आहे. याचा व्हिडिओ कर्णधार शिखर धवनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. व्हिडीओला त्याने 'जिंकल्यानंतर बोलो तारा रा रा..' असे कॅप्शन दिले आहे.
shikhar dhawan dance

shikhar dhawan dance with indian players: युवा टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका जिंकली. यानंतर टीमने नाचून आनंद साजरा केला आहे. याचा व्हिडिओ कर्णधार शिखर धवनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. व्हिडीओला त्याने 'जिंकल्यानंतर बोलो तारा रा रा..' असे कॅप्शन दिले आहे.

    • shikhar dhawan dance with indian players: युवा टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका जिंकली. यानंतर टीमने नाचून आनंद साजरा केला आहे. याचा व्हिडिओ कर्णधार शिखर धवनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. व्हिडीओला त्याने 'जिंकल्यानंतर बोलो तारा रा रा..' असे कॅप्शन दिले आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाने हा सामना ८ विकेटने जिंकून मालिका २-१ अशी खिशात घातली.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर धवनने संपूर्ण संघाला सोबत घेतले आणि जबरदस्त डान्स केला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खुद्द धवनने हा व्हिडिओ रीलच्या स्वरूपात शेअर केला आहे. त्याला त्याने 'जिंकल्यानंतर बोलो तारा रा रा..' असे कॅप्शनही दिले आहे.

मालिका जिंकल्यानंतर शिखर धवनने संपूर्ण टीमसोबत बोलो तारा रा रा रा या गाण्यावर डान्स केला. अनेकदा धवन सोशल मीडियावर असे रील्स बनवताना दिसतो. झिम्बाब्वेमध्ये वनडे मालिका जिंकल्यानंतरही त्याने संघासोबत असाच डान्स केला होता. झिम्बाब्वेमध्ये धवन आणि इतर खेळाडूंनी काला चष्मा या गाण्यावर डान्स केला होता.

श्रेयस अय्यरने षटकार मारून सामना संपवला

दरम्यान, निर्णायक सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकन संघ २७.१ षटकांत अवघ्या ९९ धावांवर गारद झाला. ही दक्षिण आफ्रिकेची भारताविरुद्धची वनडेतील सर्वात कमी धावसंख्या आहे. आफ्रिकेकडून हेन्रिक क्लासेनने सर्वाधिक ३४ धावा केल्या. तर भारताकडून कुलदीप यादवने ४ विकेट घेतल्या. शिवाय मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाज अहमद यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

त्यानंतर ९९ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने १९.१ षटकांत लक्ष्याचा पाठलाग केला. भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक ४९ धावा केल्या. श्रेयस अय्यरने षटकार मारून सामना संपवला. श्रेयस अय्यरने नाबाद २८ धावा केल्या. यासह भारताने वनडे मालिका २-१ ने जिंकली. भारताने १२ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात एकदिवसीय मालिका जिंकली आहे.

पुढील बातम्या