मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Pakistan Floods: शाहनवाज दहानीचं गाव पुरात अडकलं, पाहा फोटो

Pakistan Floods: शाहनवाज दहानीचं गाव पुरात अडकलं, पाहा फोटो

Aug 30, 2022, 02:42 PM IST

    • Shahnawaz Dahani Village Flood Pictures: आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. या सामन्यात पाकिस्तानचा क्रिकेटर शाहनवाज दहानीने अखेरीस दोन षटकार ठोकले होते. शाहनवाज आशिया चषकात व्यस्त आहे. तर दुसरीकडे पुरामुळे त्याच्या गावाची अवस्था बिकट झाली आहे. 
Shahnawaz Dahani

Shahnawaz Dahani Village Flood Pictures: आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. या सामन्यात पाकिस्तानचा क्रिकेटर शाहनवाज दहानीने अखेरीस दोन षटकार ठोकले होते. शाहनवाज आशिया चषकात व्यस्त आहे. तर दुसरीकडे पुरामुळे त्याच्या गावाची अवस्था बिकट झाली आहे.

    • Shahnawaz Dahani Village Flood Pictures: आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. या सामन्यात पाकिस्तानचा क्रिकेटर शाहनवाज दहानीने अखेरीस दोन षटकार ठोकले होते. शाहनवाज आशिया चषकात व्यस्त आहे. तर दुसरीकडे पुरामुळे त्याच्या गावाची अवस्था बिकट झाली आहे. 

पाकिस्तानचा संघ सध्या दुबईत आशिया चषक खेळत आहे. संघाला २८ ऑगस्ट रोजी भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. आशिया चषक स्पर्धा दुबईत होत आहे, पण पाकिस्तानात सध्या निसर्गाचे भयंकर रूप पाहायला मिळत आहे. पाकिस्तानच्या विविध भागात महापूर आला असून तेथील गावांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

भारताविरुद्धचा सामना खेळलेला शाहनवाज दहानी याच्या गावाचीही महापूरामुळे दुरावस्था झाली आहे. संपूर्ण गाव पाण्यात बुडाले असून अनेक दिवसांपासून गावात वीज नाही. पाकिस्तानी मीडियानुसार, या गावाचा मुख्य प्रवाहाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे.

<p>Pakistan Floods</p>

शाहनवाज दहाणी हा पाकिस्तानातील सिंध भागातील खवर खान दहाणी या गावचा रहिवाशी आहे. त्याच्या गावातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जे पाकिस्तानी मीडियामध्येही आले आहेत.

स्वत: शाहनवाजनेही पाकिस्तान सरकारला गावाला मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्याने गेल्या आठवड्यात ट्विट करून लिहिले होते की, “सिंध, बलुचिस्तान आणि पंजाबमधील भागात पुरामुळे वाईट स्थिती आहे, अशा परिस्थितीत पाकिस्तान सरकार आणि इतर संस्थांनी येथे मदत करावी”.

<p>Pakistan Floods</p>

शाहनवाजची भारताविरुद्धच्या सामन्यात कामगिरी

२८ ऑगस्ट रोजी दुबईमध्ये भारत-पाकिस्तान सामना झाला. ज्यामध्ये शाहनवाज दहानीने चांगला खेळ दाखवला. पाकिस्तानी संघ अडचणीत असताना अखेरीस त्याने २ षटकार मारले होते. शाहनवाजने ६ चेंडूत १६ धावा ठोकल्या होत्या. ज्यात २ गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. मात्र, गोलंदाजीत त्याला विशेष काही करता आले नाही. त्याने चार षटकांत त्याने २८ धावा दिल्या. त्याला एकही विकेट मिळाली नाही.

 

पुढील बातम्या