मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shaheen Afridi : शाहीन आफ्रिदीची कमाल, डावाच्या पहिल्याच षटकात घेतले ४ बळी, व्हिडीओ पाहा

Shaheen Afridi : शाहीन आफ्रिदीची कमाल, डावाच्या पहिल्याच षटकात घेतले ४ बळी, व्हिडीओ पाहा

Jul 01, 2023, 11:37 AM IST

    • shaheen afridi 4 wickets in over : शाहीन आफ्रिदी टी-20 ब्लास्ट स्पर्धेत नॉटिंगहॅमशायरकडून खेळत आहे. पाकिस्तानचा हा वेगवान गोलंदाज स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.
shaheen afridi

shaheen afridi 4 wickets in over : शाहीन आफ्रिदी टी-20 ब्लास्ट स्पर्धेत नॉटिंगहॅमशायरकडून खेळत आहे. पाकिस्तानचा हा वेगवान गोलंदाज स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.

    • shaheen afridi 4 wickets in over : शाहीन आफ्रिदी टी-20 ब्लास्ट स्पर्धेत नॉटिंगहॅमशायरकडून खेळत आहे. पाकिस्तानचा हा वेगवान गोलंदाज स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी इंग्लंड गांजवत आहे. शाहीन आफ्रिदीने व्हिटॅलिटी टी-20 ब्लास्ट स्पर्धेत एक आश्चर्यकारक कामगिरी करून दाखवली आहे. वॉर्विकशायरविरुद्ध च्या सामन्यात शाहीनने डावाच्या पहिल्याच षटकात ४ बळी घेतले आणि विरोधी संघाची फलंदाजी उद्ध्वस्त करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. डावाच्या पहिल्याच षटकात ४ बळी घेणारा आफ्रिदी पहिला गोलंदाज ठरला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

शाहीन आफ्रिदी टी-20 ब्लास्ट स्पर्धेत नॉटिंगहॅमशायरकडून खेळत आहे. पाकिस्तानचा हा वेगवान गोलंदाज स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. विकेट घेण्यासोबतच आफ्रिदीने इंग्लिश परिस्थितीचा फायदा घेत फलंदाजांचे जगणे कठीण केले आहे. वॉर्विकशायरविरुद्धच्या सामन्यात शाहीनने शानदार गोलंदाजी करत चार षटकांच्या स्पेलमध्ये केवळ २९ धावा देत ४ मोठे बळी घेतले.

पहिल्याच षटकात चार विकेट

वास्तविक, प्रथम फलंदाजी करताना नॉटिंगहॅमशायरचा संपूर्ण संघ १६८ धावा करून सर्वबाद झाला. १६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वॉरविकशायरची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्याच षटकात आफ्रिदीने ओव्हरचा पहिला चेंडू वाईड टाकला आणि विरोधी संघालाही चार धावा मिळाल्या.

मात्र, त्यानंतर शाहीन आपल्या लयीत परतला आणि त्याने अ‍ॅलेक्स डेव्हिसचा डाव एका उत्कृष्ट यॉर्करने संपुष्टात आणला. पुढच्याच चेंडूवर आफ्रिदीने ख्रिस बेंजामिनला क्लीन बोल्ड केले. ओव्हरच्या पुढच्या दोन चेंडूंवर दोन धावा आल्या. यानंतर पाचव्या चेंडूवर डावखुरा वेगवान गोलंदाज डॅन मौसलीचा डाव संपुष्टात आला. त्याच वेळी, आफ्रिदीच्या हातातून बाहेर पडलेला ओव्हरचा शेवटचा चेंडू सर्वोत्तम होता, ज्यावर एड बर्नार्ड पूर्णपणे बीट झाला आणि त्याचा ऑफ स्टंप बाहेर आला.

शाहीनच्या धारदार गोलंदाजीनंतरही संघाचा पराभव

शाहीन आफ्रिदी टी-20 ब्लास्टमध्ये नॉटिंगहॅमशायर संघाकडून खेळत आहे. या सामन्यात त्यांचा संघ २० षटकात १६८ धावांवर बाद झाला, ज्यामध्ये यष्टीरक्षक टॉम मूर्सने सर्वाधिक ७३ धावांची खेळी केली. यानंतर वॉर्विकशायर संघाने लक्ष्याचा पाठलाग करताना ४९ धावांत निम्मा संघ गमावला होता. असे असतानाही त्यांनी हे लक्ष्य १९.१ षटकांत ८ गडी गमावून पूर्ण केले. वॉरविकशायरकडून रॉबर्ट येट्सनेे ६५ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली.

 

पुढील बातम्या