मराठी बातम्या  /  क्रीडा  /  FIFA World Cup : कतारनंतर आता सौदी अरेबियात रंगणार फिफा वर्ल्डकपचा थरार? ऑस्ट्रेलियानं घेतली माघार

FIFA World Cup : कतारनंतर आता सौदी अरेबियात रंगणार फिफा वर्ल्डकपचा थरार? ऑस्ट्रेलियानं घेतली माघार

Oct 31, 2023, 09:26 PM IST

    • FIFA World Cup 2034 : फिफा विश्वचषक ही जगातील सर्वात लोकप्रिय स्पर्धा आहे. २०३४ च्या फिफा वर्ल्डकप यजमानपदासाठी ऑस्ट्रेलियाचे नाव सर्वात आघाडीवर होते. पण त्यांनी अचानक आज मंगळवारी (३१ ऑक्टोबर) बोली प्रक्रियेतून माघार घेतली.
Saudi Arabia will host 2034 FIFA World Cup (REUTERS)

FIFA World Cup 2034 : फिफा विश्वचषक ही जगातील सर्वात लोकप्रिय स्पर्धा आहे. २०३४ च्या फिफा वर्ल्डकप यजमानपदासाठी ऑस्ट्रेलियाचे नाव सर्वात आघाडीवर होते. पण त्यांनी अचानक आज मंगळवारी (३१ ऑक्टोबर) बोली प्रक्रियेतून माघार घेतली.

    • FIFA World Cup 2034 : फिफा विश्वचषक ही जगातील सर्वात लोकप्रिय स्पर्धा आहे. २०३४ च्या फिफा वर्ल्डकप यजमानपदासाठी ऑस्ट्रेलियाचे नाव सर्वात आघाडीवर होते. पण त्यांनी अचानक आज मंगळवारी (३१ ऑक्टोबर) बोली प्रक्रियेतून माघार घेतली.

FIFA World Cup 2034 Saudi Arabia : फुटबॉल जगतातून मोठी बातमी समोर आली आहे. २०३४ फिफा वर्ल्डकपचे यजमानपद सौदी अरेबियाला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियन सॉकर फेडरेशनने यजमानपदासाठी बोली लावण्यास नकार दिला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

फिफा विश्वचषक ही जगातील सर्वात लोकप्रिय स्पर्धा आहे. २०३४ च्या फिफा वर्ल्डकप यजमानपदासाठी ऑस्ट्रेलियाचे नाव सर्वात आघाडीवर होते. पण त्यांनी अचानक आज मंगळवारी (३१ ऑक्टोबर) बोली प्रक्रियेतून माघार घेतली.

FIFA ने स्पर्धेच्या यजमानपदासाठी बोली सादर करण्यासाठी मंगळवारची अंतिम मुदत निश्चित केली होती. पण ऑस्ट्रेलियन सॉकर फेडरेशनने बोली प्रक्रियेतून माघार घेतली. यामुळे आता या यादीत सौदी अरेबिया हा एकमेव घोषित उमेदवार राहिला. म्हणजेच, आता २०३४ फिफा वर्ल्डकपचे यजमानपद सौदी अरेबियाला जवळपास निश्चित झाले आहे.

विशेष म्हणजे, २०२२ चा फिफा वर्ल्डकप कतारमध्ये खेळला गेला होता. यानंतर आता भविष्यात आणखी एक वर्ल्डकप पश्चिम आशियात होण्याची शक्यता आहे. २०२२ चा फिफा विश्वचषक अर्जेंटिनाने फ्रान्सला पराभूत करून जिंकला होता.

सौदी अरेबिया फुटबॉल फेडरेशनने (SAFF) सोमवारी (३० ऑक्टोबर) इरादा पत्र सादर केले. SAFF अध्यक्ष यासेर अल मिसेहल यांनी स्वाक्षरी केलेले इरादा पत्र अधिकृतपणे फिफाकडे सुपूर्त केले.

यानंतर SAFF अध्यक्ष यासेर अल मिसेहल यांनी म्हटले की, २०३४ फिफा विश्वचषकासाठी बोली लावण्याचा सौदी अरेबियाचा एक ऐतिहासिक निर्णय आहे. यामुळे देशात फुटबॉलच्या नवीन संधी निर्माण होतील. तसेच यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात खेळाच्या वाढीस समर्थनही मिळेल. हा प्रवास आमच्यासाठी खूपच रोमहर्षक आहे, असेही मिसेहल म्हणाले.

सौदी अरेबिया २०१८ पासून फुटबॉल, मोटरस्पोर्ट्स, टेनिस, घोडेस्वारी, ईस्पोर्ट्स आर्ट्स आणि गोल्फ यांसारख्या स्पर्धांचे आयोजन करते.

 

पुढील बातम्या