मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Video : विराट कोहली यंदा आयपीएल ट्रॉफी जिंकणार का? पाहा सलमान खान काय म्हणाला?

Video : विराट कोहली यंदा आयपीएल ट्रॉफी जिंकणार का? पाहा सलमान खान काय म्हणाला?

Apr 15, 2023, 11:01 PM IST

    • Salman Khan On Virat Kohli ipl trophy : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात बॉलीवूड अभिनेता सलमान खानने विराट आयपीएल ट्रॉफी जिंकणार का? याचे उत्तर दिले आहे. हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.
Salman Khan On Virat Kohli

Salman Khan On Virat Kohli ipl trophy : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात बॉलीवूड अभिनेता सलमान खानने विराट आयपीएल ट्रॉफी जिंकणार का? याचे उत्तर दिले आहे. हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.

    • Salman Khan On Virat Kohli ipl trophy : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात बॉलीवूड अभिनेता सलमान खानने विराट आयपीएल ट्रॉफी जिंकणार का? याचे उत्तर दिले आहे. हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.

Salman Khan On Virat Kohli : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सलमान खान आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) खेळाडू विराट कोहलीबद्दल (virat kohli) बोलत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान विराटची जोरदार प्रशंसा करत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

वास्तविक, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खान स्टार स्पोर्ट्सच्या शोमध्ये बोलत आहे. या व्हिडिओमध्ये तो विराट कोहली जगातील (salman khan fan of virat kohli fitness) सर्वात फिट क्रिकेटर असल्याचे सांगत आहे. एवढेच नाही तर तो जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. तसेच, सलमान पुढे म्हणाला की, तो (विराट) खूप मेहनती आहे".

विराट कोहली आयपीएल ट्रॉफी जिंकणार का?

विराट कोहलीच्या आरसीबीने अद्याप एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकलेले नाही. यंदा त्याच्या संघाने तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत.

दरम्यान, या शोमधील एका मुलाने सलमानला विचारले की, यावेळी विराट आयपीएल ट्रॉफी उचलणार का? या प्रश्नाचं उत्तर देताना सलमान म्हणाला, हार्डवर्क, कमीटमेंट, डिसीप्लीन असेल तर सर्वकाही शक्य आहे.

विराट कोहली प्लेअर ऑफ द मॅच

आज (१५ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या (rcb vs dc) सामन्यात विराट कोहलीने ३४ चेंडूत ५० धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ६चौकार आणि १ षटकार लगावला. या खेळीसाठी विराट कोहलीची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली आहे.

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा २३ धावांनी पराभव केला आहे. अशाप्रकारे डेव्हिड वॉर्नरच्या संघाला मोसमातील पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले. आयपीएल २०२३ मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हा दुसरा विजय आहे.

पुढील बातम्या