मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rohit Sharma: नाकातून रक्त गळत असतानाही मैदान सोडलं नाही, १२व्या षटकात रोहितसोबत काय घडलं?

Rohit Sharma: नाकातून रक्त गळत असतानाही मैदान सोडलं नाही, १२व्या षटकात रोहितसोबत काय घडलं?

Oct 03, 2022, 11:06 AM IST

    • Rohit Sharma nose bleeding IND vs SA 2nd T20: क्षेत्ररक्षणादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नाकातून रक्त येत असल्याचे दिसले. त्यामुळे चाहत्यांमध्ये थोडे काळजीचे वातावरण निर्माण झाले होते. रोहितला काही काळासाठी मैदानाबाहेरही जावे लागले. मात्र, तो १९ व्या षटकांत पुन्हा मैदानावर आला. 
India vs South Africa

Rohit Sharma nose bleeding IND vs SA 2nd T20: क्षेत्ररक्षणादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नाकातून रक्त येत असल्याचे दिसले. त्यामुळे चाहत्यांमध्ये थोडे काळजीचे वातावरण निर्माण झाले होते. रोहितला काही काळासाठी मैदानाबाहेरही जावे लागले. मात्र, तो १९ व्या षटकांत पुन्हा मैदानावर आला.

    • Rohit Sharma nose bleeding IND vs SA 2nd T20: क्षेत्ररक्षणादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नाकातून रक्त येत असल्याचे दिसले. त्यामुळे चाहत्यांमध्ये थोडे काळजीचे वातावरण निर्माण झाले होते. रोहितला काही काळासाठी मैदानाबाहेरही जावे लागले. मात्र, तो १९ व्या षटकांत पुन्हा मैदानावर आला. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेत भारताने २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने २३७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने चांगली झुंज दिली. मात्र, त्यांना विजयासाठी १६ धावा कमी पडल्या. आफ्रिकेच्या संघाने २२१ धावांपर्यंत मजल मारली. टीम इंडियाच्या या विजयात भारताच्या पहिल्या ४ फलंदाजांनी सर्वाधिक योगदान दिले. रोहित, राहुल, विराट आणि सूर्यकुमार यांनी शानदार फलंदाजी करत आफ्रिकेसमोर २०० हून अधिक धावांचे लक्ष्य ठेवले.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

या हाय स्कोअरिंग सामन्यात दोन्ही संघांनी एकूण ४५८ धावांचा पाऊस पडला. या सामन्यात चौकार आणि षटकारांच्या आतषबाजीशिवाय एक अशीही घटना घडली ज्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला सामन्याच्या मध्यातून मैदानाबाहेर जावे लागले.

रोहितच्या नाकातून रक्तस्त्राव

सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय संघ फिल्डिंग करत होता आणि त्याच दरम्यान रोहितच्या नाकातून रक्त येऊ लागले. गुवाहातील जास्त आर्द्रतेमुळे असे घडले. मात्र, हिटमॅनने मैदान सोडले नाही. तो टॉवेलने नाक पुसत गोलंदाज हर्षल पटेलला सूचना देत राहिला. त्याच्या खेळाप्रती समर्पणाने सर्वांची मने जिंकली. ही घटना आफ्रिकेच्या डावाच्या १२ व्या षटकात घडली. हर्षलचे षटक संपल्यानंतर मात्र, रोहित शर्माला पुढील उपचारासाठी पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

रोहिला मैदानातून बाहेर गेल्यानंतर उपकर्णधार केएल राहुलने संघाची सुत्रे हाती घेतली. मात्र, काही षटकांनंतरच रोहित मैदानात परतला. त्यामुळे काळजी करण्यासारखे काही नाही हे रोहितच्या मैदानात येण्याने स्पष्ट झाले.

तत्पूर्वी, भारताकडून सूर्यकुमार यादवने २२ चेंडूत ६१, केएल राहुलने २८ चेंडूत ५७, विराट कोहलीने नाबाद ४९ आणि कर्णधार रोहित शर्माने ४३ धावा केल्या. प्रत्युत्तरात आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही. आघाडीचे तीन फलंदाज स्वस्तात बाद झाले. मात्र, त्यानंतर डेव्हिड मिलरचे (१०६*) शानदार शतक आणि क्विंटन डी कॉकच्या (६९*) अर्धशतकाने आफ्रिकेच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. मात्र, त्यांना १६ धावा कमी पडल्या.

पुढील बातम्या