मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Harmanpreet Kaur : टीम इंडियाच्या कॅप्टनवर जय शाह नाराज! हरमनप्रीतला लक्ष्मणसमोर द्यावी लागणार उत्तरं

Harmanpreet Kaur : टीम इंडियाच्या कॅप्टनवर जय शाह नाराज! हरमनप्रीतला लक्ष्मणसमोर द्यावी लागणार उत्तरं

Jul 28, 2023, 08:40 PM IST

    • BCCI On Harmanpreet Kaur : बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण हरमप्रीत कौरशी चर्चा करतील.
harmanpreet kaur

BCCI On Harmanpreet Kaur : बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण हरमप्रीत कौरशी चर्चा करतील.

    • BCCI On Harmanpreet Kaur : बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण हरमप्रीत कौरशी चर्चा करतील.

Jay Shah On Harmanpreet Kaur : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत संपली. या मालिकेतील तिसर्‍या सामन्यात हरमनप्रीत कौरला पायचीत बाद देण्यात आले. या निर्णयवार हरमनप्रीत चांगलीच संतापली होती. तिने आपली बॅट संतापाच्या भरात स्टंपवर मारली. त्यानंतर पॅव्हेलियनकडे जात असतानाही ती पंचांना काहीतरी बोलताना दिसली.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

तसेच, प्रेझेंटेशन सेरेमनीमध्येही तिने बांगलादेशी महिला संघाची कर्णधार निगार सुलतानाला टोमणा मारला. निगार सुलताना हरमनप्रीतला फोटो सेशनसाठी बोलवत होती, पण हरमनप्रीतने 'अंपायरला बोलव, असा टोमणा मारला.

यानंतर आता हरमनप्रीत कौरच्या या वागणुकीवर बीसीसीआय चांगलेच नाराज असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाबाबत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले की, बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (NCA) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यासंदर्भात हरमप्रीत कौरसोबत बोलणार आहेत.

काय म्हणाले जय शाह?

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण हरमप्रीत कौरशी चर्चा करतील. 

दरम्यान, त्या घटनेनंतर हरमनप्रीत कौरवर आयसीसीनेही कारवाई केली. आयसीसीने हरमनप्रीत कौरवर २ सामन्यांची बंदी घातली आहे. लेव्हल टू गुन्ह्यात हरमनप्रीत कौर दोषी आढळली आहे. त्यामुळे तिच्यावर दोन सामन्यांच्या बंदी व्यतिरिक्त मॅच फीच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला. 

यासोबतच भारतीय कर्णधाराला तीन डिमेरिट गुणही देण्यात आले आहेत. प्रत्यक्षात शुक्रवारी दिल्लीत राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत बीसीसीआयचे सचिव शाह देखील सहभागी झाले होते. बीसीसीआयचे सचिव शाह यांनी स्पष्टपणे सांगितले की, हरमनप्रीत कौरवर आयसीसीने घातलेल्या दोन सामन्यांच्या बंदीच्या विरोधात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अपील करणार नाही. तेव्हापासूनच बीसीसीआय आणि जय शाह हरमनप्रीत कौरच्या वागणूकीवर खूप नाराज असल्याचे मानले जात होते.

पुढील बातम्या