मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rishabh Pant Video : गुड न्यूज! क्रचशिवाय चालतोय ऋषभ पंत, टेबल टेनिस खेळतानाही दिसला

Rishabh Pant Video : गुड न्यूज! क्रचशिवाय चालतोय ऋषभ पंत, टेबल टेनिस खेळतानाही दिसला

May 05, 2023, 08:46 PM IST

    • Rishabh Pant Health Update : पंतने हा ११ सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पंत पहिल्यांदा एका स्टिकच्या मदतीने (Rishabh Pant Walking Without Crutches) चालत असल्याचे दिसून येते. त्यानंतर तो ती फेकून देतो आणि त्याच्या पायावर चालू लागतो.
Rishabh Pant Health Update

Rishabh Pant Health Update : पंतने हा ११ सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पंत पहिल्यांदा एका स्टिकच्या मदतीने (Rishabh Pant Walking Without Crutches) चालत असल्याचे दिसून येते. त्यानंतर तो ती फेकून देतो आणि त्याच्या पायावर चालू लागतो.

    • Rishabh Pant Health Update : पंतने हा ११ सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पंत पहिल्यांदा एका स्टिकच्या मदतीने (Rishabh Pant Walking Without Crutches) चालत असल्याचे दिसून येते. त्यानंतर तो ती फेकून देतो आणि त्याच्या पायावर चालू लागतो.

rishabh pant started walking without support : टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत अपघातानंतर आता वेगाने बरा होत आहे. गेल्या आठवड्यापासून त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) पुनर्वसन सुरू केले आहे. बीसीसीआयच्या जागतिक दर्जाच्या सुविधेत तो मैदानात लवकर परतण्यासाठी मेहनत घेत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांना सतत अपडेट्स देत असतो. आजही (५ एप्रिल) त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आता कोणत्याही आधाराशिवाय चालताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

क्रॅचविना चालतोय ऋषभ पंत

पंतने हा ११ सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पंत पहिल्यांदा एका स्टिकच्या मदतीने चालत असल्याचे दिसून येते. त्यानंतर तो ती फेकून देतो आणि त्याच्या पायावर चालू लागतो. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, हॅपी नो मोअर क्रचेस डे! #RP17.

दुसरीकडे, आणखी एका व्हिडिओमध्ये ऋषभ पंत एनसीएमध्ये टेबल टेनिस खेळताना दिसत आहेत. काही आठवड्यांपूर्वी पंतने एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये तो क्रॅचच्या मदतीने चालताना दिसत होता.

दरम्यान, ऋषभने बुधवारी (३ एप्रिल) रात्रीही इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तो जिममध्ये असल्याचे दिसून येत होते. या फोटोत तो जिममध्ये लिहिलेल्या एका ओळीकडे बोट दाखवताना दिसत होता. ऋषभच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

दिल्ली कॅपिटल्सची निराशाजनक कामगिरी

गेल्या वर्षाच्या अखेरीस ऋषभ पंत एका भीषण रस्ता अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. पंत झपाट्याने बरा होत आहे. आयपीएल 2023 मध्ये त्याच्या जागी डेव्हिड वॉर्नरला दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद देण्यात आले आहे. पंतच्या अनुपस्थितीत संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. दिल्लीने ९ पैकी फक्त ३ सामने जिंकले आहेत आणि पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे.

पुढील बातम्या