मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rishabh Pant Video : ऋषभ पंतने तर कमालच केली, वनडे वर्ल्डकपपूर्वी गुड न्यूज! पाहा

Rishabh Pant Video : ऋषभ पंतने तर कमालच केली, वनडे वर्ल्डकपपूर्वी गुड न्यूज! पाहा

Jun 14, 2023, 05:56 PM IST

    • Rishabh Pant Health Update : यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत डिसेंबर २०२२ मध्ये कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. आता पंतने एनसीएमध्ये रिकव्हरी प्रोसेस सुरू केली आहे. वनडे वर्ल्डकपपूर्वी हे शुभ संकेत मानले जात आहेत.
Rishabh Pant Health Update

Rishabh Pant Health Update : यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत डिसेंबर २०२२ मध्ये कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. आता पंतने एनसीएमध्ये रिकव्हरी प्रोसेस सुरू केली आहे. वनडे वर्ल्डकपपूर्वी हे शुभ संकेत मानले जात आहेत.

    • Rishabh Pant Health Update : यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत डिसेंबर २०२२ मध्ये कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. आता पंतने एनसीएमध्ये रिकव्हरी प्रोसेस सुरू केली आहे. वनडे वर्ल्डकपपूर्वी हे शुभ संकेत मानले जात आहेत.

तुम्ही ऋषभ पंतचे चाहते असाल तर ही बातमी तुमचा आनंदी बनवेल. कारण ऋषभ पंतच्या हेल्थशी संबंधित एक मोठे अपडेट समोर आले आहे. विशेष म्हणजे एक व्हिडीओ शेअर करून पंतने स्वत: ही अपडेट दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

व्हिडीओमध्ये काय आहे?

वास्तविक, ऋषभ पंतने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये पंत काठीच्या सहाय्याने स्ट्रेचिंग करण्याचा प्रयत्न करत आहे. यानंतर तो प्रथमच पूर्णपणे पायावर चालताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये पंत पहिला आधार घेऊन पायऱ्या चढताना दिसत आहे. या दरम्यान त्याला हलक्या वेदना होत असल्याचे दिसून येते. मात्र, व्हिडिओच्या दुसऱ्या भागात पंत कोणत्याही समस्या किंवा अस्वस्थतेशिवाय सहज पायऱ्या चढताना दिसत आहेत.

कार अपघातात बळी पडल्यानंतर पंत पहिल्यांदाच सराव करताना दिसला आहे. भारतीय संघासाठी ही आनंदाची बातमी आहे. मात्र, यंदा भारतात होणाऱ्या विश्वचषकापर्यंत ऋषभ पंत तंदुरुस्त होणार नसल्याचे मानले जात आहे.

इंग्लंडमध्ये जाणवली पंतची उणीव

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऋषभ पंतची उणीव स्पष्टपणे जाणवली. पंतच्या जागी डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना खेळणारा केएस भरत दोन्ही डावात फलंदाजी करताना फ्लॉप ठरला. त्याचबरोबर इंग्लंडमध्ये पंतचा विक्रम नेहमीच उत्कृष्ट राहिला आहे. त्यामुळेच पंत लवकरात लवकर फिट व्हावा यासाठी भारतीय संघ आणि क्रिकेट चाहते प्रार्थना करत आहेत.

पुढील बातम्या