मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rishabh Pant Fitness : ऋषभ पंतची रिकव्हरी पाहून NCA चा स्टाफ हैराण, दिवसभरात काय-काय करतो? जाणून घ्या

Rishabh Pant Fitness : ऋषभ पंतची रिकव्हरी पाहून NCA चा स्टाफ हैराण, दिवसभरात काय-काय करतो? जाणून घ्या

Jun 16, 2023, 11:12 AM IST

    • Rishabh Pant health update : ऋषभ पंत सध्या एनसीएमध्ये आहे, येथे तो रिहॅब प्रक्रियेतून (rishabh pant recovery) जात आहे. पंत वेगाने बरा होत आहे. त्याची रिकव्हरी पाहून NCA चा स्टाफ पूर्णपणे हैराण झाला आहे.
Rishabh Pant health update

Rishabh Pant health update : ऋषभ पंत सध्या एनसीएमध्ये आहे, येथे तो रिहॅब प्रक्रियेतून (rishabh pant recovery) जात आहे. पंत वेगाने बरा होत आहे. त्याची रिकव्हरी पाहून NCA चा स्टाफ पूर्णपणे हैराण झाला आहे.

    • Rishabh Pant health update : ऋषभ पंत सध्या एनसीएमध्ये आहे, येथे तो रिहॅब प्रक्रियेतून (rishabh pant recovery) जात आहे. पंत वेगाने बरा होत आहे. त्याची रिकव्हरी पाहून NCA चा स्टाफ पूर्णपणे हैराण झाला आहे.

Rishabh Pant World Cup 2023 : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आता वेगाने बरा होत आहे. पंतच्या फिटनेसमध्ये ज्या पद्धतीने सुधार होत आहे, ते पाहता तो २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत पुनरागमन करू शकेल, अशी आशा BCCI ला आहे. ऋषभ पंतची रिकव्हरी पाहून नॅशनल क्रिकेट अकादमीचा (NCA) स्टाफ पूर्णपणे आश्चर्यचकित झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

'ESPNcricinfo' नुसार, ऋषभ पंत अपेक्षेपेक्षा वेगाने रिकव्हर होत आहे. विशेष म्हणजे तो आता त्याच्या शारिरिक वेदनांपासून काहीसा मुक्त झाला आहे. पंत कोणत्याही आधाराशिवाय चालायला लागला आहे. नुकताच त्याने एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो कोणाचीही मदत न घेता पायऱ्या चढत होता. पंत शरीराची ताकद वाढवत आहे. यासाठी तो थोडीशी स्विमिंग देखील करत आहे. मात्र, तो क्रिकेटच्या मैदानात कधी परतेल, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पंत लोवर बॉडीलर खूप लक्ष देत आहे. दिल्ली कॅपिटल्समध्ये पंतसोबत काम करणाऱ्या एस रजनीकांतने पंतसाठी काही व्यायाम सुचवले आहेत. रजनीकांत यांनी विविध वयोगटातील भारतीय खेळाडूंसोबत काम केले आहे. त्यांनी यापूर्वी हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि मुरली विजय यांना रिकव्हरीसाठी मदत केली आहे. त्याच वेळी, अपघातानंतर काही दिवसांनी ऋषभ पंतला विमानाने मुंबईला नेण्यात आले तेव्हापासून एक एनसीए फिजिओ तुलसी राम त्याच्यासोबतच आहेत.

पंत दिवसभरात काय करतो?

ऋषभ पंतने त्याच्या रिहॅबमध्ये एक्वा थेरपी, लाइट स्विमिंग आणि टेबल टेनिसचा समावेश केला आहे. तो दिवसभरात यावर काम करतो. याशिवाय तो एनसीएमध्ये वयोगटातील क्रिकेटपटूंसाठी सत्रही घेत आहे. व्हीव्हीएस लक्ष्मणने आयोजित केलेल्या सत्रांमुळे पंतला मनोबल वाढवण्यात आणि एकसंधपणा तोडण्यास मदत झाली.

पुढील बातम्या