मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rishabh Pant: ऋषभला वाचवणाऱ्या ड्रायव्हर-कंडक्टरला मिळालं बक्षीस, दोघांनी सांगितली संपूर्ण घटना

Rishabh Pant: ऋषभला वाचवणाऱ्या ड्रायव्हर-कंडक्टरला मिळालं बक्षीस, दोघांनी सांगितली संपूर्ण घटना

Dec 31, 2022, 11:45 AM IST

    • Rishabh Pant Car Accident update: ऋषभ पंतवर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पंतच्या डोक्याला आणि पायाला सर्वाधिक दुखापत झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या मेंदू आणि मणक्याचे एमआरआय स्कॅनही करण्यात आले.
Rishabh Pant Car Accident

Rishabh Pant Car Accident update: ऋषभ पंतवर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पंतच्या डोक्याला आणि पायाला सर्वाधिक दुखापत झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या मेंदू आणि मणक्याचे एमआरआय स्कॅनही करण्यात आले.

    • Rishabh Pant Car Accident update: ऋषभ पंतवर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पंतच्या डोक्याला आणि पायाला सर्वाधिक दुखापत झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या मेंदू आणि मणक्याचे एमआरआय स्कॅनही करण्यात आले.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावला आहे. शुक्रवारी (३० डिसेंबर) पहाटे पंतच्या कारला रुरकीजवळ अपघात झाला. या अपघातानंतर हरियाणा रोडवेजचा बस ड्रायव्हर सुशील कुमार आणि कंडक्टर परमजीत हे सर्वप्रथम पंतजवळ पोहोचले. त्यांनीच रुग्णवाहिका बोलावून पंतला रुग्णालयात पाठवले.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

राज्य सरकारही दोघांचा सन्मान करणार

या प्रशंसनीय कामासाठी या दोघांनाही मोठा पुरस्कार मिळाला आहे. वास्तविक, सुशील कुमार आणि परमजीत यांचा पानिपत डेपोने गौरव केला आहे. उत्तराखंड सरकारनेही या दोन्ही देवदूतांचा सन्मान करणार असल्याचे जाहीर केले आहे. दोघांनी मानवतेसाठी प्रशंसनीय काम केले असून त्यांचा आदर केलाच पाहिजे, असे सरकारने म्हटले आहे

पानिपत डेपोचे महाव्यवस्थापक कुलदीप झांगरा यांनी या दोघांचाही गौरव केला आहे. यावेळी ते म्हणाले की, 'सुशील आणि परमजीतने जखमी माणसाला वाचवून चांगले काम केले आहे. बराच वेळानंतर त्यांना कळले की तो क्रिकेटर ऋषभ पंत आहे. त्यांचा आम्हाला अभिमान आहे".

कंडक्टर परमजीने काय सांगितलं

बस कंडक्टर परमजीत म्हणाला, 'आम्ही त्याला (ऋषभ पंत) बाहेर काढताच कारला ५-७ सेकंदात आग लागली आणि ती जळून खाक झाली. त्याच्या पाठीवर खूप जखमा होत्या. यानंतर, आम्ही त्याला विचारले की तो कोण आहे, तेव्हा त्याने सांगितले की तो क्रिकेटपटू ऋषभ पंत आहे".

दरम्यान, सुशील आणि परमजीत यांना आणखीन ५-७ सेकंद उशीर झाला तर काहीतरी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता होती.

डुलकी लागली आणि कार डिव्हायडरला धडकली

ऋषभ पंतचा हा अपघात रुरकीजवळील गुरुकुल नारसन परिसरात घडला. पंत स्वतः कार चालवत होता. अपघातानंतर पंतने सांगितले की, गाडी चालवताना त्याला डुलकी लागली आणि कार डिव्हायडरला धडकली. त्यानंतर विंड स्क्रिन तोडत तो बाहेर आला. यानंतर गाडीला भीषण आग लागली.

सध्या ऋषभ पंतवर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पंतच्या डोक्याला आणि पायाला सर्वाधिक दुखापत झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या मेंदू आणि मणक्याचे एमआरआय स्कॅनही करण्यात आले. ज्याचा अहवाल समोर आला आहे. या अहवालामुळे चाहत्यांना आणि खुद्द पंतला मोठा दिलासा मिळाला आहे. रिपोर्ट नॉर्मल आला आहे.

 

पुढील बातम्या