मराठी बातम्या  /  क्रीडा  /  T20 WC Final: शाहीन किंवा अर्शदीप नव्हे, हा आहे ‘बॉलर ऑफ द टुर्नामेंट’, पॉंटिंगनं केली निवड

T20 WC Final: शाहीन किंवा अर्शदीप नव्हे, हा आहे ‘बॉलर ऑफ द टुर्नामेंट’, पॉंटिंगनं केली निवड

Nov 14, 2022, 02:25 PM IST

    • Sam Curran Bowler of the Tournament t20 world cup 2022: इंग्लंडला दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात सॅम करनची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने फायनलमध्ये ४ षटकांत १२ धावा देत ३ पाकिस्तानी फलंदाजांची शिकार केली. सोबतच त्याने १५ डॉट बॉल टाकले. करनने या सामन्यात सर्वात मोठ्या २ शिकार केल्या. त्याने मोहम्मद रिझवान आणि शान मसूदला बाद केले.
ricky ponting

Sam Curran Bowler of the Tournament t20 world cup 2022: इंग्लंडला दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात सॅम करनची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने फायनलमध्ये ४ षटकांत १२ धावा देत ३ पाकिस्तानी फलंदाजांची शिकार केली. सोबतच त्याने १५ डॉट बॉल टाकले. करनने या सामन्यात सर्वात मोठ्या २ शिकार केल्या. त्याने मोहम्मद रिझवान आणि शान मसूदला बाद केले.

    • Sam Curran Bowler of the Tournament t20 world cup 2022: इंग्लंडला दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात सॅम करनची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने फायनलमध्ये ४ षटकांत १२ धावा देत ३ पाकिस्तानी फलंदाजांची शिकार केली. सोबतच त्याने १५ डॉट बॉल टाकले. करनने या सामन्यात सर्वात मोठ्या २ शिकार केल्या. त्याने मोहम्मद रिझवान आणि शान मसूदला बाद केले.

विश्वचषक २०२२ च्या फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव केला. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रंगलेल्या फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा ५ विकेट्सने धुव्वा उडवला. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकात ८ बाद १३७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने ५ गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. इंग्लंड दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड चॅम्पियन ठरली आहे. यापूर्वी त्यांनी २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून जेतेपद मिळवले होते. बेन स्टोक्स आणि सॅम करन हे फायनलमधील इंग्लंडच्या विजयाचे हिरो ठरले.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

सॅम करनने संपूर्ण स्पर्धेत ६ सामन्यात १३ बळी घेतले. या कामिगरीमुळे त्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या पुरस्काराने गौरवण्यात आले. या शिवाय आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगनेही सॅम करनचे कौतुक केले आहे. त्यानेही सॅम करन हा 'बॉलर ऑफ द टुर्नामेंट' असल्याचे सांगितले आहे.

ICC च्या एखा व्हिडीओमध्ये त्याने सॅम करनबाबत हे उद्गार काढले. पॉंटिंग म्हणाला की, ‘ करनने ज्या प्रकारे या संपूर्ण स्पर्धेत गोलंदाजी केली. ते पाहता माझ्यासाठी बॉलर ऑफ द टुर्नामेंट निवडणे अवघड नव्हते. करनने मधल्या षटकांमध्ये आणि डेथ ओव्हर्समध्ये कमालीची गोलंदाजी केली’.

दरम्यान, इंग्लंडला दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात सॅम करनची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने फायनलमध्ये ४ षटकांत १२ धावा देत ३ पाकिस्तानी फलंदाजांची शिकार केली. सोबतच त्याने १५ डॉट बॉल टाकले. करनने या सामन्यात सर्वात मोठ्या २ शिकार केल्या. त्याने मोहम्मद रिझवान आणि शान मसूदला बाद केले. करनने संपूर्ण स्पर्धेत ६ सामन्यात १३ बळी घेतले.

पुढील बातम्या