मराठी बातम्या  /  क्रीडा  /  DC VS RCB WPL 2023 : आरसीबीचा सलग पाचवा पराभव, शेवटच्या षटकात दिल्लीनं बाजी मारली

DC VS RCB WPL 2023 : आरसीबीचा सलग पाचवा पराभव, शेवटच्या षटकात दिल्लीनं बाजी मारली

Mar 13, 2023, 10:49 PM IST

    • WPL Delhi Vs RCB Today Match highlights : महिला प्रीमियर लीगच्या ११व्या सामन्यात आज (१३ मार्च) दिल्ली कॅपिटल्सचा (DC) सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी RCB) झाला. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात दिल्लीने शेवटच्या षटकात विजय मिळवला.
WPL Delhi Vs RCB Today Match highlights

WPL Delhi Vs RCB Today Match highlights : महिला प्रीमियर लीगच्या ११व्या सामन्यात आज (१३ मार्च) दिल्ली कॅपिटल्सचा (DC) सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी RCB) झाला. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात दिल्लीने शेवटच्या षटकात विजय मिळवला.

    • WPL Delhi Vs RCB Today Match highlights : महिला प्रीमियर लीगच्या ११व्या सामन्यात आज (१३ मार्च) दिल्ली कॅपिटल्सचा (DC) सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी RCB) झाला. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात दिल्लीने शेवटच्या षटकात विजय मिळवला.

Delhi Capitals vs Royal Challengers Bangalore : महिला प्रीमियर लीगच्या ११व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहा गडी राखून पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने २० षटकांत ४ बाद १५० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्लीने १९.४ षटकांत ४ फलंदाजांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

बंगळुरू संघाचा हा सलग पाचवा पराभव आहे. या लीगमध्ये संघाला अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही आणि गुणतालिकेत ते तळाच्या पाचव्या स्थानावर आहेत. त्याचबरोबर दिल्ली संघाचा पाच सामन्यांतील हा चौथा विजय ठरला. मुंबईविरुद्धचा एकमेव सामना संघाने हरला आहे. दिल्लीचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याला आठ अंक आहेत.

दिल्लीची सुरुवात वाईट

दरम्यान, १५१ धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात वाईट झाली. शेफाली वर्मा दुसऱ्याच चेंडूवर क्लीन बोल्ड झाली. तिला मेग शूटने तंबूत पाठवले. त्यानंतर आलेल्या एलीस कॅप्सीने वेगाने धावा केल्या. तिने २४ चेंडूत ३८ धावांची दमदार खेळी केली. कॅप्सीने आपल्या खेळीत ८ चौकार मारले. त्यानंतर जेमिमाहने कर्णधार मेग लॅनिंगसोबत काही काळ डाव सावरला. मात्र लॅनिंग या सामन्यात विशेष काही करू शकली नाही. तिने १८ चेंडूत १५ धावा केल्या.

शेवटच्या षटकात विजयासाठी ९ धावांची गरज

त्यानंतर मारिजेन कॅप आणि जेस जोनासन यांनी झटपट खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकात विजयासाठी ९ धावांची गरज होती. पहिल्या दोन चेंडूवर दोन सिंगल आल्यानंतर जेस जोनासनने तिसऱ्या चेंडूवर षटकार खेचला आणि विजय निश्चित केला. त्यानंतर जेसने पुढच्या म्हणजेच चौथ्या चेंडूवर चौकार मारून विजय मिळवला. शेवटचे षटक रेणुका सिंगे टाकले. जेस जोनासेनने ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १५ चेंडूत २९ धावा केल्या. तर मारिजेन कॅपने नाबाद ३२ चेंडूत ३२ धावा केल्या.

आरसीबीचा डाव

तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत ४ बाद १५० धावा केल्या. बेंगळुरूकडून एलिस पेरीने ५२ चेंडूत ६७ धावांची नाबाद खेळी खेळली. याशिवाय रिचा घोषने १६ चेंडूत ३७ धावा केल्या. या दोघींशिवाय एकाही फलंदाजाला विशेष काही करता आले नाही.

बंगळुरूची सुरुवात खराब झाली. कर्णधार स्मृती मानधना पुन्हा एकदा अपयशी ठरली आणि १५ चेंडूत ८ धावा करून बाद झाली. यानंतर सोफी डिव्हाईनही १९ चेंडूत २१ धावा करून बाद झाली. शिखा पांडेने दोघींना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर १२ चेंडूत ११ धावा करून हीदर नाइटही तारा नॉरिसची शिकार झाली.

६३ धावांत तीन विकेट पडल्यानंतर पेरी आणि रिचा यांनी कमान सांभाळली. दोघींनी चौथ्या विकेटसाठी ३४ चेंडूत ७४ धावांची भागीदारी केली. मात्र, १९व्या षटकात शिखा पांडेने रिचा घोषला यष्टिरक्षक तानिया भाटियाकरवी झेलबाद केले.

रिचाने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ३ षटकार मारले. पेरीने ६७ धावांच्या नाबाद खेळीत ४ चौकार आणि ५ षटकार मारले. शेवटच्या ५ षटकात पेरीच्या बळावर आरसीबीने ७० धावा केल्या आणि एक विकेट गमावली. दिल्लीकडून शिखाने ३ आणि नॉरिसने १ विकेट घेतली.

पुढील बातम्या