मराठी बातम्या  /  क्रीडा  /  RCB vs UPW Highlights : मानधनाच्या आरसीबीचा पराभवाचा चौकार, युपी वॉरियर्सनं १० विकेट्सनं हरवलं

RCB vs UPW Highlights : मानधनाच्या आरसीबीचा पराभवाचा चौकार, युपी वॉरियर्सनं १० विकेट्सनं हरवलं

Mar 10, 2023, 06:50 PM IST

    • RCB vs UPW Live Score : महिला प्रीमियर लीगमधील (WPL 2023) आठवा सामना आज युपी वॉरियर्स (WPW) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात युपीने आरसीबीचा १० विकेट्सने धुव्वा उडवला.
RCB vs UPW Live Score

RCB vs UPW Live Score : महिला प्रीमियर लीगमधील (WPL 2023) आठवा सामना आज युपी वॉरियर्स (WPW) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात युपीने आरसीबीचा १० विकेट्सने धुव्वा उडवला.

    • RCB vs UPW Live Score : महिला प्रीमियर लीगमधील (WPL 2023) आठवा सामना आज युपी वॉरियर्स (WPW) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात युपीने आरसीबीचा १० विकेट्सने धुव्वा उडवला.

WPL LIVE Cricket Score, RCB vs UPW Womens Premier League 2023 : महिला प्रीमियर लीगमधील (WPL 2023) आठवा सामना आज युपी वॉरियर्स (WPW) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात झाला. या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आरसीबीचा संपूर्ण संघ १९.३ षटकात १३८ धावांवर गारद झाला. यूपी वॉरियर्सला विजयासाठी १३९ धावांचे लक्ष्य मिळाले. प्रत्युत्तरात यूपी वॉरियर्सने १३ षटकात एकही विकेट न गमावता १३९ धावा करत सामना जिंकला.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

RCB vs UP match Score updates

आरसीबीचा सलग चौथा पराभव

आरसीबीविरुद्ध यूपी वॉरियर्सने १३ षटकात १३९ धावांचे लक्ष्य गाठले. युपीला या स्पर्धेतील दुसरा विजय मिळाला आहे. तीन सामन्यांत त्यांचे ४ गुण झाले आहेत. ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. दिल्ली कॅपिटल्सचे देखील तीन सामन्यांतून ४ गुण आहेत, परंतु ते चांगल्या नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहेत. मुंबई इंडियन्सचा संघ तीन सामन्यांत तीन विजयांसह अव्वल स्थानावर आहे.

नाणेफेक जिंकून आरसीबीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांचा संपूर्ण संघ १९.३ षटकांत १३८ धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात यूपी वॉरियर्सने १३ षटकात एकही विकेट न गमावत १३९ धावा करत सामना जिंकला. 

कर्णधार एलिसा हिली आणि देविका वैद्य यांनी यूपीसाठी पहिल्या विकेटसाठी १३९ धावांची भागीदारी केली. पण एलिसा हिलीला शतक पूर्ण करता आले नाही. तिने ४७ चेंडूत ९६ धावांवर नाबाद राहिली. तिने आपल्या खेळीत १८ चौकार आणि १ षटकार मारला. देविकाने ३१ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने नाबाद ३६ धावा केल्या.

RCB vs UPW Live Score : यूपीची वेगवान सुरुवात

आरसीबीने दिलेल्या १३९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूपी वॉरियर्सची सुरुवात चांगली झाली आहे. त्यांनी तीन षटकांत बिनबाद ३२ धावा केल्या आहेत. कर्णधार अॅलिस हिली १९ आणि देविका वैद्य १३ धावा करून खेळत आहेत.

RCB vs UPW Live Score : आरसीबी १३८ धावांवर ऑलआऊट

आरसीबीच्या फलंदाजांची खराब कामगिरी यूपी वॉरियर्सविरुद्धच्या सामन्यातही कायम राहिली. नाणेफेक जिंकल्यानंतर आरसीबीच्या संघाचा डाव १९.३ षटकात १३८ धावांवर गारद झाला. त्यांच्यासाठी केवळ चारच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. एलिस पॅरीने ३९ चेंडूत ५२ धावा केल्या. सोफी डेव्हाईनने २४ चेंडूत ३६, श्रेयंका पाटीलने १० चेंडूत १५ आणि एरिन बर्न्सने ९ चेंडूत १२ धावा केल्या. कर्णधार स्मृती मानधना केवळ ४ धावा करू शकली. 

तर यूपी वॉरियर्सकडून सोफी एक्लेस्टोनने ४ विकेट घेतल्या. दीप्ती शर्माला ३ बळी मिळाले. राजेश्वरी गायकवाडने एक विकेट घेतली.

RCB vs UPW Live Score : आरसीबीचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

आरसीबीचा निम्मा संघ ११६ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. आरसीबीला श्रेयंका पाटीलच्या रूपाने पाचवा धक्का बसला. तिने १० चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने १५ धावा केल्या. तिचा झेल सोफी एक्लेस्टोनच्या चेंडूवर अंजली सरवानीने टिपला. आता एलिस पेरी ही आरसीबीची शेवटची आशा आहे. ५१ धावा करून ती क्रीजवर आहे. शेवटच्या षटकांमध्ये झटपट धावा काढण्याची जबाबदारी तिच्यावर असेल.

RCB vs UPW Live Score : एक्लेस्टोनने डेव्हाईनला बोल्ड केले

यूपी वॉरियर्सच्या सोफी एक्लेस्टोनने संघाला आणखी एक यश मिळवून दिले. तिने नवव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सोफी डिव्हाईनला बाद केले. २४ चेंडूत ३६ धावा करून डिव्हाईन क्लीन बोल्ड झाली. तिने आपल्या खेळीत ५ चौकार आणि एक षटकार मारला.

RCB vs UPW Live Score : डिव्हाईन-पेरीनं डाव सांभाळला

आरसीबीने सात षटकांत एका गडी बाद ५९ धावा केल्या आहेत. स्मृती मानधना बाद झाल्यानंतर सोफी डिव्हाईन आणि एलिस पेरी यांनी डावाची धुरा सांभाळली आहे. दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी ३० धावांची भागीदारी केली. सोफी डेव्हाईन २१ चेंडूत ३३ आणि एलिस पॅरी १५ चेंडूत २२ धावांवर खेळत आहे.

RCB vs UPW Live Score : अशा आहेत दोन्ही प्लेइंग इलेव्हन

यूपी वॉरियर्स

एलिसा हिली (कर्णधार/विकेटकीपर), श्वेता सेहरावत, किरण नवगिरे, ताहलिया मॅकग्रा, दीप्ती शर्मा, ग्रेस हॅरिस, देविका वैद्य, सिमरन शेख, सोफी एक्लेस्टोन, अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: 

स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, एलिस पेरी, हेदर नाइट, रिचा घोष (विकेटकीपर), एरिन बर्न्स, श्रेयंका पाटील, कनिका आहुजा, सहाना पवार, कोमल जंजाड, रेणुका ठाकूर सिंग.

RCB vs UPW Live Score : RCB प्रथम फलंदाजी करेल

आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना हिने यूपी वॉरियर्सविरुद्ध नाणेफेक जिंकली आहे. त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यूपी वॉरियर्सने संघात एक बदल केला आहे. शबनम इस्माईलच्या जागी ग्रेस हॅरिसला प्लेइंग-११ मध्ये स्थान देण्यात आले आहे.

RCB vs UPW Live Score : आरसीबी पहिल्या विजयाच्या शोधात

महिला प्रीमियर लीग (WPL) चा आठवा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि UP वॉरियर्स यांच्यात थोड्याच वेळात खेळवला जाईल. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने असतील. आरसीबी संघ स्पर्धेतील पहिल्या विजयाच्या शोधात आहे. आतापर्यंतचे तिन्ही सामने त्यांनी गमावले आहेत. दुसरीकडे, यूपीने दोनपैकी एक सामना जिंकला आहे.

दोन्ही संघ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू -

स्मृती मानधना (कर्णधार), रिचा घोष (विकेटकीपर), सोफी डिव्हाईन, एलिस पेरी, हीदर नाइट, कनिका आहुजा, पूनम खेमनार, श्रेयंका पाटील, मेगन शुट, रेणुका ठाकूर सिंग, प्रीती बोस, दिशा कासट, एरिन, बर्न्स कोमल झांझाड, इंद्राणी रॉय, सहाना पवार, आशा शोबाना, डेन व्हॅन निकर्क

यूपी वॉरियर्स -

 अ‍ॅलिसा हिली (कर्णधार आणि विकेटकीपर), श्वेता सेहरावत, किरण नवगिरे, ताहलिया मॅकग्रा, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, सिमरन शेख, सोफी एक्लेस्टोन, शबनीम इस्माईल, अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड, ग्रेस हॅरिस, पार्श्वी चोप्रा, लक्ष्मी यादव, लॉरेन बेल, एस यशश्री.

पुढील बातम्या