मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ravindra Jadeja : टीम इंडियाच्या खेळाडूंना पैशांचा घमंड! कपिल देव यांच्या वक्तव्यावर जडेजानं दिलं प्रत्युत्तर

Ravindra Jadeja : टीम इंडियाच्या खेळाडूंना पैशांचा घमंड! कपिल देव यांच्या वक्तव्यावर जडेजानं दिलं प्रत्युत्तर

Aug 01, 2023, 01:48 PM IST

    • Ravindra Jadeja on Kapil Dev : भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी टीम इंडियाच्या सध्याच्या खेळाडूंना अहंकारी म्हटले होते. आता कपिल देव यांच्या या वक्तव्यावर ऑलराउंडर रविंद्र जडेजाने प्रतिक्रिया दिली आहे.
Ravindra Jadeja on Kapil Dev

Ravindra Jadeja on Kapil Dev : भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी टीम इंडियाच्या सध्याच्या खेळाडूंना अहंकारी म्हटले होते. आता कपिल देव यांच्या या वक्तव्यावर ऑलराउंडर रविंद्र जडेजाने प्रतिक्रिया दिली आहे.

    • Ravindra Jadeja on Kapil Dev : भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी टीम इंडियाच्या सध्याच्या खेळाडूंना अहंकारी म्हटले होते. आता कपिल देव यांच्या या वक्तव्यावर ऑलराउंडर रविंद्र जडेजाने प्रतिक्रिया दिली आहे.

Ravindra Jadeja Reply to Kapil Dev : भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. येथे टीम इंडियाला ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ६ विकेटने पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना खराब कामगिरीमुळे टीकेला सामोरे जावे लागले.

ट्रेंडिंग न्यूज

Para Championship 2024 : मजुराच्या लेकीनं जपानमध्ये रचला इतिहास, आई-वडिलांना टोमणे मारणाऱ्यांना लगावली सणसणीत चपराक

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

त्याचवेळी भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी टीम इंडियाच्या सध्याच्या खेळाडूंना अहंकारी म्हटले होते. आता कपिल देव यांच्या या वक्तव्यावर ऑलराउंडर रविंद्र जडेजाने प्रतिक्रिया दिली आहे. रवींद्र जडेजाने म्हटले आहे की, जेव्हा आपण एक-दोन सामने हरतो तेव्हा अशी विधाने समोर येतच असतात.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी पत्रकारांशी संवाद साधताना रवींद्र जडेजाने कपिल देव यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर सांगितले की, “मला त्यांच्या वक्तव्याबाबत फारशी माहिती नाही. मी सोशल मीडियावर अशा गोष्टी शोधत नाही. प्रत्येकाचे स्वतःचे मत आहे. तसं काही नाही. प्रत्येक खेळाडू आपल्या खेळाचा आनंद लुटतो आणि सतत मेहनत घेत असतो. कोणताही खेळाडू संघातील आपले स्थान हलक्यात घेत नाही आणि संधी मिळाल्यावर १०० टक्के देण्याचा प्रयत्न करतो”.

रवींद्र जडेजा पुढे म्हणाला की, जेव्हा जेव्हा भारतीय संघ सामना हरतो तेव्हा असे प्रश्न उपस्थित केले जातात. संघात कोणताही खेळाडू अहंकारी नाही. भारताकडून खेळताना प्रत्येकजण आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. आम्ही देशासाठी खेळण्यासाठी खूप मेहनत करतो. इथे कोणाचाही वैयक्तिक अजेंडा नाही".

तिसऱ्या वनडेत सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू

मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्याबाबत जडेजाने सांगितले की, ही मालिका जिंकण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. निर्णायक सामन्यात कर्णधार रोहित शर्माचे संघात पुनरागमन पाहायला मिळू शकते.

पुढील बातम्या