मराठी बातम्या  /  क्रीडा  /  RR vs LSG IPL 2023 : राजस्थानच्या जो रुटची लखनौला धास्ती?, हेलिकॉप्टर शॉट मारतानाचा तो व्हिडिओ व्हायरल

RR vs LSG IPL 2023 : राजस्थानच्या जो रुटची लखनौला धास्ती?, हेलिकॉप्टर शॉट मारतानाचा तो व्हिडिओ व्हायरल

Apr 19, 2023, 05:46 PM IST

    • Joe Root Helicopter Shot : इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज जो रुट राजस्थानकडून खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण आता नेटमध्ये सराव केल्याचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Joe Root Helicopter Shot Viral Video (HT)

Joe Root Helicopter Shot : इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज जो रुट राजस्थानकडून खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण आता नेटमध्ये सराव केल्याचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

    • Joe Root Helicopter Shot : इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज जो रुट राजस्थानकडून खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण आता नेटमध्ये सराव केल्याचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Joe Root Helicopter Shot Viral Video : आयपीएलच्या गुणतालिकेत प्रथम स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्स आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या लखनौ सुपरजायंट्समध्ये थोड्याच वेळात स्पर्धेतील वर्चस्वासाठी सामना रंगणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थानने चार तर लखनौने तीन सामने जिंकत आयपीएलवर दावा ठोकला आहे. त्यामुळं आता आजच्या सामना चांगलाच चुरशीचा आणि रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजस्थानच्या ताफ्यात इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज जो रुटचा समावेश करण्यात आला आहे. लखनौ सारख्या बलाढ्य संघाला हरवण्यासाठी राजस्थानने रुटला खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातचा आता आजच्या सामन्यापूर्वी जो रुटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Para Championship 2024 : मजुराच्या लेकीनं जपानमध्ये रचला इतिहास, आई-वडिलांना टोमणे मारणाऱ्यांना लगावली सणसणीत चपराक

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

राजस्थान रॉयल्सने शेयर केलेल्या व्हिडिओत जो रुटने हेलिकॉप्टर शॉट मारत संघाला विजय मिळवून देण्यासाठी तयार असल्याचे संकेत दिले आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये जो रुट अद्याप एकही सामना खेळलेला नाही. नेटमध्ये सराव करताना त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता जो रुट आज लखनौविरुद्ध खेळणार असल्याची चर्चा रंगली आहे. याशिवाय जो रुटचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देत त्याचं कौतुक केलं आहे. याशिवाय राजस्थानला जो रुट खेळत असताना हरवायचं असेल तर लखनौला आणखी मेहनत करावी लागणार असल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे.

SRH vs MI IPL 2023 : मुलाने पहिली विकेट घेताच सचिन तेंडुलकर भावूक, माजी क्रिकेटरने सांगितली इनसाईड स्टोरी

आयपीएलचा हंगाम ३१ मार्चपासून सुरू झालेला आहे. परंतु गेल्या दोन आठवड्यांपासून आयपीएलमधील प्रत्येक सामना हा अखेरच्या षटकापर्यंत जात असल्यामुळं स्पर्धेतील चुरस वाढली आहे. त्यातच आता इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुट हा देखील राजस्थानकडून खेळणार असल्यामुळं राजस्थान-लखनौ सामन्यात क्रिकेटच्या चाहत्यांना दोन्ही संघांमध्ये विजयासाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.

पुढील बातम्या