मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs WI T20 : कोच राहुल द्रविड हार्दिकला सपोर्ट करत नाही, 'या' भारतीय विकेटकीपरचा मोठा दावा

IND vs WI T20 : कोच राहुल द्रविड हार्दिकला सपोर्ट करत नाही, 'या' भारतीय विकेटकीपरचा मोठा दावा

Aug 08, 2023, 03:06 PM IST

    • Parthiv Patel On Rahul Dravid Coaching : वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाला पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले, त्यानंतर चाहत्यांनी भारतीय कर्णधार हार्दिक पांड्या आणि कोच राहुल द्रविडवर टीकेची झोड उठवली आहे.
Rahul Dravid

Parthiv Patel On Rahul Dravid Coaching : वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाला पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले, त्यानंतर चाहत्यांनी भारतीय कर्णधार हार्दिक पांड्या आणि कोच राहुल द्रविडवर टीकेची झोड उठवली आहे.

    • Parthiv Patel On Rahul Dravid Coaching : वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाला पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले, त्यानंतर चाहत्यांनी भारतीय कर्णधार हार्दिक पांड्या आणि कोच राहुल द्रविडवर टीकेची झोड उठवली आहे.

Parthiv Patel On Rahul Dravid Coaching : भारतीय संघ सध्या हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजविरुद्ध ५ टी-20 सामन्यांची मालिका खेळत आहे. पहिले दोन सामने गमावल्यानंतर टीम इंडिया मालिकेत ०-२ ने पिछाडीवर आहे. भारताच्या सलग दोन पराभवानंतर कर्णधार हार्दिक पंड्यावर टीकेची झोड उठताना दिसत आहे. या दरम्यान, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हा कर्णधार हार्दिकला सपोर्ट करत नसल्याचा मोठा दावा भारतीय खेळाडू पार्थिव पटेलने केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

हार्दिकला आशिष नेहरा (गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक) सारख्या आश्वासक प्रशिक्षकाची गरज आहे, असे पार्थिवचे मत आहे. हार्दिक पांड्याने त्याच्या नेतृत्वाखाली पहिल्याच सत्रात (IPL 2022) गुजरातला चॅम्पियन बनवले. यानंतर, पुढील हंगामात (IPL 2023), गुजरात टायटन्स अंतिम फेरीत पोहोचला, जिथे संघाला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.

'क्रिकबझ' वर बोलताना पार्थिव पटेल म्हणाला, की "हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदात अनेक चुका झाल्या आहेत.पहिली चूक पहिल्या टी-20 मध्ये घडली ती म्हणजे,  निकोलस पूरन बॅटींगला आल्यावर अक्षर पटेलला बॉलिंग देणे. तसेच, दुसऱ्या टी-20 मध्ये युझी चहलच्या ४ ओव्हर पूर्ण झाल्या नाहीत. चहलला चौथे षटक दिले असते तर सामन्याचा निकाल कदाचित वेगळा असता'. 

पार्थिव पुढे म्हणाला की,  हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणून चमकदार कामगिरी करत आहे, पण त्याला गुजरात टायटन्समध्ये आशिष नेहराची साथ मिळते. पण राहुल द्रविड हा अॅक्टिव्ह कोच आहे का? ज्याचा आपण टी-20 फॉरमॅटमध्ये शोध घेत आहोत. मला असे वाटत नाही. माझ्या मनात, आपल्याला खूप अॅक्टिव्ह असलेल्या व्यक्तीची गरज आहे. हार्दिकच्या आत ती चिंगारी आहे पण त्याला आधार हवा आहे, जो माझ्या मते राहुल द्रविड देत नाही".

पुढील बातम्या