मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rahul Dravid Net Worth : इंदिरा नगरमध्ये ४ कोटींचे घर, लक्झरी वाहनं, द्रविडची संपत्ती किती? ऐकून धक्का बसेल

Rahul Dravid Net Worth : इंदिरा नगरमध्ये ४ कोटींचे घर, लक्झरी वाहनं, द्रविडची संपत्ती किती? ऐकून धक्का बसेल

Aug 08, 2023, 03:35 PM IST

    • Rahul Dravid Net Worth car collection : राहुल द्रविड किती कोटींचा मालक आहे हे तुम्हाला माहीत आहे का? त्याचा पगार किती आहे आणि त्याच्या कलेक्शनमध्ये कोणत्या आलिशान गाड्या आहेत, हे जाणून घ्या.
Rahul Dravid Net Worth

Rahul Dravid Net Worth car collection : राहुल द्रविड किती कोटींचा मालक आहे हे तुम्हाला माहीत आहे का? त्याचा पगार किती आहे आणि त्याच्या कलेक्शनमध्ये कोणत्या आलिशान गाड्या आहेत, हे जाणून घ्या.

    • Rahul Dravid Net Worth car collection : राहुल द्रविड किती कोटींचा मालक आहे हे तुम्हाला माहीत आहे का? त्याचा पगार किती आहे आणि त्याच्या कलेक्शनमध्ये कोणत्या आलिशान गाड्या आहेत, हे जाणून घ्या.

भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आपल्या क्रिकेटसोबतच नम्र स्वभावासाठी ओळखला जातो. तो अनेक वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. क्रिकेटमध्ये राहुल द्रविडला 'मिस्टर डिपेंडेबल', 'द वॉल' या टोपणनावाशिवाय 'मिस्टर कूल' म्हणूनही ओळखले जाते. केवळ चाहतेच नाही तर विरोधी संघातील खेळाडूही राहुल द्रविडच्या नम्रतेचे चाहते आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

एक खेळाडू म्हणून, राहुल द्रविडने टीम इंडियासाठी १६४ कसोटी आणि ३४४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. राहुल द्रविडने कसोटी क्रिकेटमध्ये १३२८८ धावा केल्या आहेत, तर वनडेमध्ये १०८८९ धावा केल्या आहेत. यासोबतच राहुल द्रविडचे असे अनेक विक्रम आहेत, जे चाहत्यांना कायम लक्षात राहतील.

पण राहुल द्रविड किती कोटींचा मालक आहे हे तुम्हाला माहीत आहे का? त्याचा पगार किती आहे आणि त्याच्या कलेक्शनमध्ये कोणत्या आलिशान गाड्या आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का?

राहुल द्रविडचा नेटवर्थ किती?

एका रिपोर्टनुसार, राहुल द्रविडची एकूण संपत्ती ४० मिलियन डॉलर्स आहे. भारतीय चलनात द्रविडची एकूण संपत्ती ३२० कोटी एवढी आहे. तो दरमहा जवळपास 1 कोटी कमावतो तर त्याचे वार्षिक उत्पन्न १२ कोटी रुपये आहे. कोचिंग व्यतिरिक्त हे उत्पन्न जाहिराती इत्यादींमधून मिळते. राहुल द्रविडने कॅस्ट्रॉल, मॅक्स लाइफ, रिबॉक आणि जिलेट सारख्या ब्रँड्सच्या जाहिराती केल्या आहेत, ज्यातून त्याने करोडोंची कमाई केली आहे.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होण्यापूर्वी राहुल द्रविड २ वर्षे अंडर-19 संघाचा हेड कोच होता. यादरम्यान त्याला जवळपास ५ कोटी रुपये पगार मिळत असे. ज्युनियर संघाच्या प्रशिक्षकासोबतच द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (NCA) प्रमुखही होता. या दरम्यान त्याला महिन्याला ६० लाख रुपये पगार मिळत असे.

याशिवाय द्रविडने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत बीसीसीआय करार, मॅच फी आणि पुरस्कारांमधून पैसे कमावले आहे. निवृत्तीनंतर तो आयपीएल संघाचा प्रशिक्षकही होता. याशिवाय त्याने कॉमेंट्रीही केली आहे यातून चांगली कमाईही झाली आहे.

राहुल द्रविडला लक्झरी वाहनांचा शौक 

क्रिकेट व्यतिरिक्त द्रविडबद्दल असे म्हटले जाते की त्याला लक्झरी वाहनांचा शौक आहे. मात्र, तो क्वचितच ही वाहने चालवताना दिसतो. राहुल द्रविडच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज बेंझ, बीएमडब्ल्यू 5 सीरीज, लॅम्बोर्गिनी आणि ऑडी क्यू 5 लक्झरी एसयूव्ही सारख्या वाहनांचा समावेश आहे. याशिवाय बंगळुरूच्या इंदिरा नगरमध्ये त्याचे एक आलिशान घर आहे, ज्याची किंमत सुमारे ४ कोटी आहे.

पुढील बातम्या