मराठी बातम्या  /  क्रीडा  /  French Open 2022: लाल मातीचा बादशहा नदालच, फ्रेंच ओपनमध्ये १४ व्यांदा अजिंक्य

French Open 2022: लाल मातीचा बादशहा नदालच, फ्रेंच ओपनमध्ये १४ व्यांदा अजिंक्य

Jun 05, 2022, 09:29 PM IST

    • क्ले कोर्टचा बादशाह राफेल नदालने फ्रेंच ओपन २०२२ स्पर्धा जिंकत आपल्या करिअरमधले २२ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले आहे.
राफेल नदाल

क्ले कोर्टचा बादशाह राफेल नदालने फ्रेंच ओपन २०२२ स्पर्धा जिंकत आपल्या करिअरमधले २२ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले आहे.

    • क्ले कोर्टचा बादशाह राफेल नदालने फ्रेंच ओपन २०२२ स्पर्धा जिंकत आपल्या करिअरमधले २२ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले आहे.

स्पेनच्या राफेल नदालने फ्रेंच ओपन २०२२ ही स्पर्धा जिंकली आहे. नदालने अंतिम सामन्यात नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा पराभव केला.  या विजयासह राफेल नदालने १४ व्या वेळेस फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

क्ले कोर्टचा बादशाह राफेल नदालने फ्रेंच ओपन २०२२ स्पर्धा जिंकत आपल्या करिअर मधले २२ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले आहे. राफेल नदालने अंतिम सामन्यात कॅस्पर रुडचा ६-३, ६-३, ६-० अशा सेट्समध्ये पराभव केला.  हा सामना २ तास १८ मिनिटांपर्यंत चालला. नॉर्वेचा कॅस्पर रुडचा त्याच्या करिअर मध्ये पहिल्यांदाच एखाद्या ग्रँडस्लॅमचे फायनल खेळत होता.

नदालने अंतिम सामन्यातील पहिला सेट अगदी सहज ६-३ ने आपल्या नावे केला. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलीच झुंज पाहायला मिळाली. या सेटमध्ये रुडने १-३ अशी बढत मिळवली होती. मात्र, शेवटी नदालने जोरदार पुनरागमन करत दुसरा सेटही ६-३ असा जिंकला. तर तिसऱ्या सेटमध्येही नदालने सहजरीत्या विजय मिळवून सामना आपल्या खिशात घातला. 

दरम्यान, स्पर्धेतील पहिल्या सेमी फायनलमध्ये नदालला वॉकओव्हर मिळाला होता. पायाच्या दुखापतीमुळे झ्वेरेव त्या सामन्यातून बाहेर पडला. त्याला व्हील चेअरवर बसून बाहेर जावे लागले. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कॅस्पर रुडने क्रोएशियाच्या मारिन सिलिकचा पराभव केला होता.

सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकण्याच्या बाबतीत राफेल नदाल जगात पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर आता २२ ग्रँडस्लॅम झाले आहेत. या यादीत स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोविच संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. दोघांनी २०-२० ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. २०१८ पासून फेडरर एकदाही चॅम्पियन बनला नाही. गेल्या वेळी त्याने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली होती. दुसरीकडे जोकोविचने गेल्या वर्षी विम्बल्डन ओपन स्पर्धा जिंकली होती.

नदालने १४ व्यांदा फ्रेंच ओपनची अंतिम फेरी गाठली. २००५ मध्ये त्याने पहिल्यांदा हे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर २००६, २००७, २००८, २०१०, २०११, २०१२, २०१३, २०१४, २०१७, २०१८, २०१९ आणि २०१० मध्ये विजय मिळवला. त्याने चार यूएस ओपन, दोन ऑस्ट्रेलियन ओपन आणि दोन विम्बल्डन ओपनचे विजेतेपदही जिंकले आहेत.

पुढील बातम्या