मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Video: १२ हजार तिकिटांसाठी ४० हजार क्रिकेट रसिकांची गर्दी, महिलांमध्ये हाणामारी

Video: १२ हजार तिकिटांसाठी ४० हजार क्रिकेट रसिकांची गर्दी, महिलांमध्ये हाणामारी

Jun 10, 2022, 04:25 PM IST

    • तिकिट खरेदीदरम्यान काही महिलांनी रांग मोडली. त्यामुळे त्यांचा बाकिच्यांशी वाद झाला.
ticket counter

तिकिट खरेदीदरम्यान काही महिलांनी रांग मोडली. त्यामुळे त्यांचा बाकिच्यांशी वाद झाला.

    • तिकिट खरेदीदरम्यान काही महिलांनी रांग मोडली. त्यामुळे त्यांचा बाकिच्यांशी वाद झाला.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा T20 सामना कटक येथील बाराबती स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. रविवारी १२ जून रोजी होणाऱ्या या सामन्यापूर्वी गुरुवारी तिकीटविक्री दरम्यान मोठा गदारोळ झाला. तिकीट खरेदीसाठी रांगेत उभ्या असलेल्या महिलांनी आपापसात हाणामारी केली आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Para Championship 2024 : मजुराच्या लेकीनं जपानमध्ये रचला इतिहास, आई-वडिलांना टोमणे मारणाऱ्यांना लगावली सणसणीत चपराक

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिकिट खरेदीदरम्यान काही महिलांनी रांग मोडली. त्यामुळे त्यांचा बाकिच्यांशी वाद झाला. त्यानंतर परिस्थीती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला आहे. व्हिडिओमध्ये काही महिला आपापसात भांडताना दिसत आहेत. पोलिसांनी वाद मिटवल्यानंतरही वाद सुरूच होता. काही लोक आधी तिकीट काढण्यासाठी रांगेतून बाहेर पडले, त्यामुळे बाकीच्यांशी त्यांची हाणामारी झाली.

अनेक वर्षांनतर क्रिकेट सामना-

दरम्यान, कटक येथील बाराबती स्टेडियमवर २०१९ नंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. रखरखत्या उन्हातही क्रिकेट चाहते तासंतास रांगेत उभे राहिले होते. यावरूनच चाहत्यांची या सामन्याबद्दलची क्रेझ लक्षात येते. यावेळी कटकचे डीसीपी आणि त्यांची टीम तिकिटांसाठी रांगेत उभ्या असलेल्या लोकांना पाणी वाटताना दिसले. यामुळे त्यांचे कौतुक होत आहेत.

१२ हजार तिकिटांंसाठी ४० हजार लोकांची गर्दी-

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाराबती स्टेडियममध्ये जवळपास ४० हजार लोकं तिकीट खरेदी करण्यासाठी पोहोचले होते, परंतु तिथे केवळ १२ हजार तिकिटांचीच विक्री होणार होती. बाराबती स्टेडियमची आसनक्षमता ४५ हजार आहे. मात्र, अनेक तिकिटे आधीच विकली गेली आहेत. यावरून भारत-दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या सामन्यात स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलेले असणार आहे.

 

पुढील बातम्या