मराठी बातम्या  /  क्रीडा  /  National Games: १० वर्षीय शौर्यजितनं हे काय करुन दाखवलं; पंतप्रधान मोदीदेखील झाले फॅन, एकदा पाहाच!

National Games: १० वर्षीय शौर्यजितनं हे काय करुन दाखवलं; पंतप्रधान मोदीदेखील झाले फॅन, एकदा पाहाच!

Oct 09, 2022, 11:30 AM IST

    • mallakhamb player shauryajit-National Games 2022: १० वर्षीय शौर्यजितने ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आपल्या कामगिरीने खळबळ उडवून दिली आहे. त्याच्या कामगिरीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही त्याचे चाहते झाले आहेत. मूळचा गुजरातचा असलेल्या शौर्यजितने वडिलांच्या निधनानंतरही राष्ट्रीय खेळांमध्ये भाग घेतला, यावरून त्याचा आत्मविश्वास दिसून येतो.
shauryajit- National Games 2022

mallakhamb player shauryajit-National Games 2022: १० वर्षीय शौर्यजितने ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आपल्या कामगिरीने खळबळ उडवून दिली आहे. त्याच्या कामगिरीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही त्याचे चाहते झाले आहेत. मूळचा गुजरातचा असलेल्या शौर्यजितने वडिलांच्या निधनानंतरही राष्ट्रीय खेळांमध्ये भाग घेतला, यावरून त्याचा आत्मविश्वास दिसून येतो.

    • mallakhamb player shauryajit-National Games 2022: १० वर्षीय शौर्यजितने ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आपल्या कामगिरीने खळबळ उडवून दिली आहे. त्याच्या कामगिरीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही त्याचे चाहते झाले आहेत. मूळचा गुजरातचा असलेल्या शौर्यजितने वडिलांच्या निधनानंतरही राष्ट्रीय खेळांमध्ये भाग घेतला, यावरून त्याचा आत्मविश्वास दिसून येतो.

सध्या गुजरातमध्ये ३६व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी मल्लखांब या खेळाला देखील या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही स्थान मिळाले आहे.या खेळात १० वर्षीय शौर्यजितने आपल्या कामगिरीने सर्वांना थक्क केले आहे. शौर्यजित राष्ट्रीय खेळ २०२२ या स्पर्धेत सहभागी होणारा सर्वात तरुण खेळाडू आहे. आपल्या असाधारण कामगिरीच्या जोरावर त्याने प्रेक्षकांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील आपला फॅन बनवले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

शौर्यजितचे कौतुक करताना नरेंद्र मोदींनी ट्विटरवर लिहिले आहे की, 'शौर्यजित काय स्टार आहे.'

विशेष म्हणजे, मूळचा गुजरातचा असलेल्या शौर्यजितने वडिलांच्या निधनानंतर राष्ट्रीय खेळांमध्ये भाग घेतला आहे. शौर्यजित म्हणाला, 'राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवावे, हे माझ्या वडिलांचे स्वप्न होते.' तो मल्लखांब का खेळू लागला, असे विचारले असता शौर्यजित म्हणाला की, त्याने या खेळाची निवड केली जेणेकरून जागतिक स्पर्धेतही याच खेळात त्याला सुवर्णपदक जिंकता येईल.

मल्लखांब हा एक खेळ आहे, ज्यामध्ये खेळाडू लाकडी उभ्या स्थिर किंवा लटकलेल्या खांबावर आपला कर्तृत्व दाखवतो. या खेळात सहभागी होण्यासाठी खेळाडूच्या शरीरातील लवचिकता खूप महत्त्वाची असते. या गेममध्ये, खेळाडू वेगवेगळ्या पोझिशनमध्ये स्टंट करतो. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शौर्यजितने दाखवलेला पराक्रम पाहून लोक थक्क झाले आहेत.

२९ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत होणाऱ्या या राष्ट्रीय खेळांमध्ये एकूण ३६ खेळांचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये देशभरातील सुमारे ७ हजार खेळाडू सहभागी होत आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा असल्याचे सांगितले जात आहे. गुजरातमधील गांधीनगर, अहमदाबाद, सुरत, वडोदरा, राजकोट आणि भावनगर या ६ शहरांमध्ये राष्ट्रीय खेळ २०२२ चे आयोजन केले जात आहे.

पुढील बातम्या