मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shan Masood Wedding : पाकिस्तानच्या भावी कर्णधारानं केलं लग्न, पत्नीला किस करतानाचा फोटो केला शेअर

Shan Masood Wedding : पाकिस्तानच्या भावी कर्णधारानं केलं लग्न, पत्नीला किस करतानाचा फोटो केला शेअर

Jan 22, 2023, 03:29 PM IST

    • Shan Masood wedding : शान मसूदच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याच्या लग्नाला अनेक पाकिस्तानी क्रिकेटर्सनी हजेरी लावली होती. शान मसूद २७ जानेवारीला लग्नाचे रिसेप्शन देणार आहे.
Shan Masood Wedding

Shan Masood wedding : शान मसूदच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याच्या लग्नाला अनेक पाकिस्तानी क्रिकेटर्सनी हजेरी लावली होती. शान मसूद २७ जानेवारीला लग्नाचे रिसेप्शन देणार आहे.

    • Shan Masood wedding : शान मसूदच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याच्या लग्नाला अनेक पाकिस्तानी क्रिकेटर्सनी हजेरी लावली होती. शान मसूद २७ जानेवारीला लग्नाचे रिसेप्शन देणार आहे.

पाकिस्तानी क्रिकेटर शान मसूदने त्याची मंगेतर निशा खानसोबत (२१ जानेवारी) लग्नगाठ बांधली आहे. पेशावर येथे झालेल्या सोहळ्यात दोघांनी निकाह केला. या शानदार सोहळ्यात पाकिस्तानचे अनेक क्रिकेटपटू सहभागी झाले होते. पाकिस्तानचा सध्याचा निवडकर्ता शाहिद आफ्रिदी आणि अष्टपैलू शादाब खान यांचाही यात समावेश आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

२१ जानेवारीला पेशावरमध्ये निशा खानचा निरोप समारंभ पार पडला. हे जोडपे २७ जानेवारी रोजी त्यांच्या मित्र आणि कुटुंबासाठी वलीमाचे (रिसेप्शन) आयोजन करणार आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला या जोडप्याच्या निकाहाचा उत्सव सुरू झाला होता.

शान मसूदने लग्न समारंभासाठी पांढरा कुर्ता परिधान केला होता, तर नववधूने चांदीच्या कडांनी सजवलेला नक्षीदार असा स्काय ब्लू लेहेंगा घातला होता.

३२ वर्षीय शान मसूदने आपल्या देशासाठी २७ कसोटी सामने, ५ एकदिवसीय सामने आणि १९ टी-20 सामने खेळले आहेत. २०२२ च्या टी-20 विश्वचषकात तो पाकिस्तान संघाचा भाग होता. शिवाय, शानने अलीकडेच यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लबसोबत दोन वर्षांच्या करार केला आहे.

शान मसूद हा पाकिस्तानातील प्रसिद्ध बँकर मन्सूर मसूद खान यांचा मुलगा आहे. त्याचे काका वकार मसूद खान हे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे महसूल आणि अर्थविषयक सल्लागार होते.मममममममम

शान मसूदने २०१३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्याने २०१९ मध्ये एकदिवसीय आणि २०२२ मध्ये टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत २ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्याच वेळी, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने १४४ सामन्यांमध्ये ९ हजरांहून अधिक धावा केल्या आहेत.

गेल्या वर्षी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने त्याचा क्लासमेट मुजना मसूद मलिकसोबत लग्न केले होते. याशिवाय वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीही ३ फेब्रुवारी २०२३ रोजी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची मुलगी अन्शा आफ्रिदीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.

पुढील बातम्या