मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shoaib Akhtar Biopic : शोएब अख्तरने बायोपिक सोडला, निमार्त्यांनाही दिली कडक वॉर्निंग

Shoaib Akhtar Biopic : शोएब अख्तरने बायोपिक सोडला, निमार्त्यांनाही दिली कडक वॉर्निंग

Jan 22, 2023, 04:23 PM IST

    • rawalpindi express biopic : पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या जीवनावर बनत असलेला बायोपिक चित्रपट आता थांबवण्यात आला आहे. शोएबने स्वत:ला यापासून वेगळे केले आहे, तसेच निर्मात्यांना हा प्रोजेक्ट पुढे न नेण्याचा इशारा दिला आहे.
Shoaib Akhtar Biopic

rawalpindi express biopic : पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या जीवनावर बनत असलेला बायोपिक चित्रपट आता थांबवण्यात आला आहे. शोएबने स्वत:ला यापासून वेगळे केले आहे, तसेच निर्मात्यांना हा प्रोजेक्ट पुढे न नेण्याचा इशारा दिला आहे.

    • rawalpindi express biopic : पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या जीवनावर बनत असलेला बायोपिक चित्रपट आता थांबवण्यात आला आहे. शोएबने स्वत:ला यापासून वेगळे केले आहे, तसेच निर्मात्यांना हा प्रोजेक्ट पुढे न नेण्याचा इशारा दिला आहे.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही काळापूर्वी शोएब अख्तरच्या जीवनावर रावळपिंडी एक्सप्रेस नावाचा चित्रपट येत असल्याची घोषणा करण्यात आली होती. आता शोएब अख्तरने या बायोपिकमधून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. अख्तरने चित्रपट निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

शोएब अख्तरने सोशल मीडियावर चाहत्यांना याची माहिती दिली. शोएब अख्तर म्हणाला की, मला अत्यंत दुःखाने कळवावे लागत आहे की, अनेक महिन्यांच्या चर्चेनंतर मी रावळपिंडी एक्सप्रेस या चित्रपटापासून वेगळा झालो आहे.

यासोबतच शोएब अख्तरने निर्मात्यांना इशाराही दिला आहे, त्याने लिहिले की, जर चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट पुढे नेला, किंवा माझ्या नावावर किंवा माझ्याशी संबंधित कोणतीही कथा बनवली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

या चित्रपटात शोएब अख्तरची भूमिका साकारणारा अभिनेता उमीर जसवालनेही चित्रपट सोडला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, उमीरने जाहीर केले होते की चित्रपट निर्मात्यांसोबतच्या आशयावरून झालेल्या वादामुळे त्याने रावळपिंडी एक्सप्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

शोएब अख्तरची गणना जगातील सर्वात वेगवान आणि धोकादायक गोलंदाजांमध्ये केली जाते. तो पाकिस्तानच्या सुपरस्टार क्रिकेटपटूंपैकी एक आहे. तसेच, क्रिकेट सोडल्यानंतर तो कॉमेंट्री आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सतत चर्चेत राहतो.

पुढील बातम्या