मराठी बातम्या  /  क्रीडा  /  एक घाव दोन तुकडे! एक शतक अन् बाबर आझमने विराट-डिव्हिलियर्सचे २ रेकॉर्ड तोडले

एक घाव दोन तुकडे! एक शतक अन् बाबर आझमने विराट-डिव्हिलियर्सचे २ रेकॉर्ड तोडले

Jun 09, 2022, 02:08 PM IST

    • बाबर आझमच्या आधी विराट कोहली वनडेमध्ये सर्वात जलद १ हजार धावा करणारा कर्णधार होता. विराटने १७ डावात हा पराक्रम केला होता.
virat kohli

बाबर आझमच्या आधी विराट कोहली वनडेमध्ये सर्वात जलद १ हजार धावा करणारा कर्णधार होता. विराटने १७ डावात हा पराक्रम केला होता.

    • बाबर आझमच्या आधी विराट कोहली वनडेमध्ये सर्वात जलद १ हजार धावा करणारा कर्णधार होता. विराटने १७ डावात हा पराक्रम केला होता.

बाबर आझमने (babar azam) वेस्ट इंडिजविरुद्धच्या (pakistan vs west indies) वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात शतक ठोकले. या शतकानंतर बाबरने दोन मोठे विक्रम आपल्या नावे केले आहेत. त्याने विराट कोहली, (virat kohli)  हाशिम आमला (hashim amla) आणि एबी डिव्हिलियर्ससारख्या (ab deviliers) दिग्गजांनाही मागे टाकले आहे. बाबर आझम आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १ हजार धावा करणारा कर्णधार बनला आहे. कर्णधार झाल्यानंतर बाबरने अवघ्या १३ डावात एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत, तर विराट कोहलीने १७ आणि एबी डिव्हिलियर्सने १८ डावांमध्ये कर्णधार म्हणून १ हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

या सोबतच, बाबर आझम हा सर्वात कमी डावात १७ एकदिवसीय शतके झळकावणारा फलंदाजही बनला आहे. अवघ्या ८५ डावात त्याने ही कामगिरी केली आहे. हाशिम आमलाला ९८ तर विराट कोहलीला १७ शतके पूर्ण करण्यासाठी ११२ डाव लागले होते.

बाबर आझमच्या आधी विराट कोहली वनडेमध्ये सर्वात जलद १ हजार धावा करणारा कर्णधार होता. विराटने १७ डावात हा पराक्रम केला होता. त्याचवेळी एबी डिव्हिलियर्सने १८ आणि केन विल्यमसनने कर्णधार म्हणून २० डावात १ हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

मालिकेतील पहिला सामन्यात पाकिस्तान विजयी-

दरम्यान, मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी केली. त्यांच्याकडून शाय होप आणि शामराह ब्रूक्स या फलंदाजांनी १५४ धावांची भागीदारी केली. ब्रूक्सने ७० आणि शाई होपने १२७ धावा केल्या. या दोघांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडिजने ५० षटकात ३०५ धावांपर्यंत मजल मारली होती. तर पाकिस्तानकडून हरिस रौफने ४ विकेट घेतल्या. ३०६ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या इमाम-उल-हक आणि कर्णधार बाबर यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी रचली. इमाम ६५ धावा करून बाद झाला, पण बाबरने एक बाजू लावून धरली, त्याने १०३ धावांची खेळी केली. बाबरने यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानसोबतही १०८ धावांची भागीदारी केली. रिझवानने ५९ धावा केल्या. शेवटी खुशदिल शाहने २३ चेंडूत ४१ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. वेस्ट इंडिजकडून अल्झारी जोसेफने २ बळी घेतले.

पुढील बातम्या