मराठी बातम्या  /  क्रीडा  /  PAK vs ENG Melbourne Weather: मेलबर्नमध्ये आकाशात काळ्या ढगांची गर्दी, सामना राखीव दिवशी होणार?

PAK vs ENG Melbourne Weather: मेलबर्नमध्ये आकाशात काळ्या ढगांची गर्दी, सामना राखीव दिवशी होणार?

Nov 13, 2022, 10:33 AM IST

    • Melbourne Weather Forecast, Pakistan vs England T20 WC 2022 Final: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम सामन्यात पावसाची दाट शक्यता आहे. राखीव दिवशीही खेळ झाला नाही तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.
PAK vs ENG Melbourne Weather

Melbourne Weather Forecast, Pakistan vs England T20 WC 2022 Final: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम सामन्यात पावसाची दाट शक्यता आहे. राखीव दिवशीही खेळ झाला नाही तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.

    • Melbourne Weather Forecast, Pakistan vs England T20 WC 2022 Final: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम सामन्यात पावसाची दाट शक्यता आहे. राखीव दिवशीही खेळ झाला नाही तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.

T20 World Cup 2022 Final; England Vs Pakistan: T20 विश्वचषक २०२२चा अंतिम सामना आज इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जाणार आहे, परंतु पाऊस पुन्हा एकदा या स्पर्धेत अडथळा ठरू शकतो. या स्पर्धेत पावसामुळे अनेक सामने रद्द झाले आणि अनेक सामन्यांचे निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार लागला आहे. आता अंतिम सामन्यातही पाऊस अडथळा ठरू शकतो. आयसीसीने अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवला आहे. पण  राखीव दिवशीदेखील पावसाची शक्यता खूप जास्त आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

मेलबर्नमध्ये सध्या हलका पाऊस पडत आहे, तर संपूर्ण शहर काळ्या ढगांनी वेढले आहे. अंतिम सामन्यादरम्यान पावसाबद्दल सतत चर्चा होत असून क्रिकेट चाहत्यांना हवामानात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. तथापि, मेलबर्नमधील हवामानात कोणतीही सुधारणा दिसून येत नाही.

संध्याकाळी देखील पावसाचा अंदाज

मेलबर्नमध्ये सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून पावसाची संततधार सुरु होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ऑस्ट्रेलियाच्या वेळेनुसार सामना सायंकाळी ७ वाजता सुरू होणार असून, दीड तास आधी पाऊस सुरू झाला, तर सामना वेळेवर सुरू करणे शक्य होणार नाही. 

ICC ने पावसामुळे राखीव दिवशी सामन्याची वेळ वाढवली आहे. सामन्याचा निकाल लागावा, या आशेने ICC ने राखीव दिवशी अतिरिक्त २ तास वाढवून दिले आहेत. आज पावसामुळे सामना होऊ शकला नाही तर हा सामना सोमवारी (राखीव दिवशी) होईल. सोमवारसाठी ऑस्ट्रेलियन वेळेनुसार दुपारी ३.०० ची वेळ ठेवण्यात आली असून त्यात २ तासांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. मात्र, सोमवारीही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, अशा स्थितीत दोन्ही दिवशी सामन्यांचे आयोजन करण्याचे मोठे आव्हान स्पर्धेच्या आयोजकांसमोर आहे.

पुढील बातम्या