मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Cricket News : द्रविड, गांगुली आणि विराटसाठी आजचा दिवस आहे खास, कारण…

Cricket News : द्रविड, गांगुली आणि विराटसाठी आजचा दिवस आहे खास, कारण…

Jun 20, 2023, 01:54 PM IST

  • Cricket News : भारतीय क्रिकेटमधील तीन दिग्गज खेळाडूंसाठी आजचा दिवस खूपच खास आहे. कारण…

Dravid - Ganguly - Virat

Cricket News : भारतीय क्रिकेटमधील तीन दिग्गज खेळाडूंसाठी आजचा दिवस खूपच खास आहे. कारण…

  • Cricket News : भारतीय क्रिकेटमधील तीन दिग्गज खेळाडूंसाठी आजचा दिवस खूपच खास आहे. कारण…

Dravid Ganguly and Kohli Test Debut : राजकारणाच्या आखाड्यात २० जून हा दिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरा होत असला तरी क्रिकेटप्रेमींसाठी आणि भारताच्या तीन दिग्गज क्रिकेटपटूंसाठी आजचा दिवस खूपच खास आहे. हे दिग्गज आहेत, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि भारताचा सध्याचा स्टार फलंदाज विराट कोहली.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

द्रविड, गांगुली आणि विराट या तिघांनीही २० जून या दिवशी भारताकडून कसोटी पदार्पण केलं होतं. या तिघांमध्ये काही बाबतीत साम्य आहे. तिन्ही खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये १०० हून अधिक सामने खेळले आहेत आणि तिघांनीही भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी १९९६ मध्ये कसोटी पदार्पण केलं तर विराट कोहलीनं २०११ मध्ये कसोटी पदार्पण केलं.

कशी राहिलीय या त्रिकुटाची कारकीर्द?

द्रविड आणि गांगुली यांनी १९९६ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून पदार्पण केलं होतं. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात दोन्ही दिग्गजांनी शानदार फलंदाजी केली आणि तो सामना अनिर्णित ठेवण्यात भारताला यश आलं. गांगुलीनं कसोटी पदार्पण करताना शतक झळकावलं, तर द्रविडचं शतक अवघ्या ५ धावांनी हुकलं.

द्रविडनं १६४ सामन्यात ५२.३१ च्या सरासरीनं १३,२८८ धावा केल्या आहेत, तर गांगुलीच्या नावावर ११३ सामन्यात ७,२१२ धावा आहेत.

गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतानं ४९ पैकी २१ सामने आणि द्रविडच्या नेतृत्वाखाली २५ पैकी ८ सामने जिंकले आहेत.

विराट कोहली

विराट कोहली वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात फ्लॉप ठरला होता. त्याला पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात १५ धावा करता आल्या. पण हळूहळू कसोटीमध्ये त्याचा जम बसला. कोहलीनं आतापर्यंत १०९ कसोटी सामन्यांमध्ये ४८.७३ च्या सरासरीनं ८४७९ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर २८ शतकं आहेत.

विराट कोहली हा कसोटी क्रिकेटमधील भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्यानं या फॉरमॅटमध्ये भारताला अव्वल स्थानावर नेलं होतं. कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं ६८ पैकी ४० सामने जिंकले आहेत. विराट आता वेस्ट इंडिज दौऱ्यावर पुढील कसोटी खेळणार आहे.

पुढील बातम्या