मराठी बातम्या  /  क्रीडा  /  World Cup 2023 : ३६ वर्षांनंतर असं घडणार, टीम इंडिया या खास दिवशी खेळणार वर्ल्डकपचा सामना

World Cup 2023 : ३६ वर्षांनंतर असं घडणार, टीम इंडिया या खास दिवशी खेळणार वर्ल्डकपचा सामना

Aug 11, 2023, 11:57 AM IST

    • world cup 2023 new schedule : भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा सुरू असेल, त्यावेळी संपूर्ण देशात अनेक मोठे उत्सव होणार आहेत. याची सुरुवात नवरात्रीने होईल, त्यानंतर कालीपूजा आणि दसरा उत्सव येईल. याशिवाय दिवाळीचा उत्सवही असेल.
india vs Netherlands

world cup 2023 new schedule : भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा सुरू असेल, त्यावेळी संपूर्ण देशात अनेक मोठे उत्सव होणार आहेत. याची सुरुवात नवरात्रीने होईल, त्यानंतर कालीपूजा आणि दसरा उत्सव येईल. याशिवाय दिवाळीचा उत्सवही असेल.

    • world cup 2023 new schedule : भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा सुरू असेल, त्यावेळी संपूर्ण देशात अनेक मोठे उत्सव होणार आहेत. याची सुरुवात नवरात्रीने होईल, त्यानंतर कालीपूजा आणि दसरा उत्सव येईल. याशिवाय दिवाळीचा उत्सवही असेल.

india vs Netherlands match on diwali : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे नवीन वेळापत्रक ९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ICC ने जाहीर केले. या नव्या वेळापत्रकानुसार वर्ल्डकपमधील ९ सामन्यांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्याचाही समावेश आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

भारत-पाकिस्तान सामना नव्या वेळापत्रकानुसार १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. याआधी हा सामना १४ ऑक्टोबरला होणार होता. तसेच भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील सामन्याची तारीखही बदलली आहे. भारत-नेदरलँड्स सामना १२ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

विशेष म्हणजे, जेव्हा भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा सुरू असेल, त्यावेळी संपूर्ण देशात अनेक मोठे उत्सव होणार आहेत. याची सुरुवात नवरात्रीने होईल, त्यानंतर कालीपूजा आणि दसरा उत्सव येईल. याशिवाय दिवाळीचा उत्सवही असेल.

टीम इंडिया आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना आता दिवाळीच्या दिवशी म्हणजेच १२ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होईल. पूर्वी हा सामना ११ नोव्हेंबर रोजी होणार होता.

दिवाळीच्या दिवशी भारत-ऑस्ट्रेलिया सामना झाला

विशेष म्हणजे, सहसा भारतीय संघाचे सामने कोणत्याही मोठ्या सणाच्या दिवशी आयोजित केले जात नाहीत आणि त्यात दिवाळीकडे विशेष लक्ष दिले जाते. यापूर्वी टीम इंडियाने ३६ वर्षांपूर्वी दिवाळीच्या दिवशी सामना खेळला होता. हा सामना १९८७ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्लीच्या मैदानावर खेळला होता. टीम इंडियाने २२ ऑक्टोबरला खेळलेला हा सामना ५६ धावांनी जिंकला होता.

९ सामन्यांची तारीख बदलली, पाकिस्तानचे तीन सामने

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, ज्यामध्ये ९ सामन्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे, ज्यामध्ये पाकिस्तान संघाच्या ३ सामन्यांचा समावेश आहे. आता पाकिस्तानचा संघ १४ ऑक्टोबरला भारताविरुद्ध खेळणार आहे. त्याचवेळी त्याचा श्रीलंकेविरुद्धचा सामना १० ऑक्टोबरला तर इंग्लंडविरुद्धचा सामना ११ नोव्हेंबरला होणार आहे.

पुढील बातम्या