मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Australian Open 2023: जोकोविचने विक्रमी १०व्यांदा जिंकली ऑस्ट्रेलियन ओपन! नदालची बरोबरी

Australian Open 2023: जोकोविचने विक्रमी १०व्यांदा जिंकली ऑस्ट्रेलियन ओपन! नदालची बरोबरी

Jan 29, 2023, 05:45 PM IST

    • Novak Djokovic won the Australian Open : नोव्हाक जोकोविच १० वेळा ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत खेळला आहे आणि प्रत्येक वेळी तो जिंकला आहे. तो सर्वाधिक ३४ वेळा ग्रँडस्लॅम फायनल खेळला आहे आणि सर्वाधिक २२ ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या बाबतीत त्याने राफेल नदालची बरोबरी केली आहे.
Australian Open 2023

Novak Djokovic won the Australian Open : नोव्हाक जोकोविच १० वेळा ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत खेळला आहे आणि प्रत्येक वेळी तो जिंकला आहे. तो सर्वाधिक ३४ वेळा ग्रँडस्लॅम फायनल खेळला आहे आणि सर्वाधिक २२ ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या बाबतीत त्याने राफेल नदालची बरोबरी केली आहे.

    • Novak Djokovic won the Australian Open : नोव्हाक जोकोविच १० वेळा ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत खेळला आहे आणि प्रत्येक वेळी तो जिंकला आहे. तो सर्वाधिक ३४ वेळा ग्रँडस्लॅम फायनल खेळला आहे आणि सर्वाधिक २२ ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या बाबतीत त्याने राफेल नदालची बरोबरी केली आहे.

सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने विक्रमी १०व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली आहे. पुरुष एकेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत त्याने ग्रीसच्या स्टेफानोस सित्सिपासचा ६-३, ७-६, ७-६ असा पराभव केला. अंतिम सामन्यात जोकोविचने शानदार सुरुवात करत पहिला सेट ६-३ अशा फरकाने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी जोरदार झुंज दिली, पण शेवटी जोकोविचने ७-७ अशा फरकाने विजय मिळवला. 

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

तिसर्‍या सेटमध्येही त्‍सित्‍सिपासने पुनरागमन करण्‍याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु जोकोविचवर मात करू शकला नाही आणि जोकोविचने ७-६ अशा फरकाने सामना जिंकला. या विजयासह तो एटीपी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला.

ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचणारा २४ वर्षीय सित्सिपास हा दुसरा सर्वात तरुण पुरुष खेळाडू आहे. त्याआधी जोकोविचने २०११ मध्ये वयाच्या २३व्या वर्षी अंतिम फेरी गाठली होती. 

जोकोविचने १०व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली. या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत तो १० वेळा पोहोचला आहे आणि प्रत्येक वेळी त्याने विजेतेपद पटकावले आहे. जोकोविचने २००८, २०११, २०१२, २०१३, २०१५, २०१६, २०१९, २०२०, २०२१ आणि आता २०२३ मध्ये विजेतेपद पटकावले आहे. २०२२ मध्ये, जोकोविच व्हिसाच्या कारणामुळे ही स्पर्धा खेळू शकला नव्हता आणि राफेल नदालने ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकले.

जोकोविचने २२ वे ग्रँडस्लॅम जिंकले

ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून जोकोविचने २२वे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले आहे. त्याने १० ऑस्ट्रेलियन ओपन, दोन फ्रेंच ओपन, ७ विम्बल्डन आणि ३ यूएस ओपनसह एकूण २२ ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या बाबतीत जोकोविचने राफेल नदालची बरोबरी केली आहे. नदालकडे २२ ग्रँडस्लॅम आहेत. त्याचबरोबर रॉजर फेडरर २० ग्रँडस्लॅमसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

पुढील बातम्या