मराठी बातम्या  /  क्रीडा  /  आंतरराष्ट्रीय धावपटू निकिता राऊतवर तीन वर्षांची बंदी; डोपिंग चाचणीत दोषी आढळल्याने कारवाई

आंतरराष्ट्रीय धावपटू निकिता राऊतवर तीन वर्षांची बंदी; डोपिंग चाचणीत दोषी आढळल्याने कारवाई

Mar 04, 2023, 07:05 AM IST

  • Nikita Raut Doping Test: डोपिंग चाचणीत दोषी आढळल्यामुळे नाडाने आंतरराष्ट्रीय धावपटू निकिता राऊतवर तीन वर्षांची बंदी घातली आहे.

Nikita Raut

Nikita Raut Doping Test: डोपिंग चाचणीत दोषी आढळल्यामुळे नाडाने आंतरराष्ट्रीय धावपटू निकिता राऊतवर तीन वर्षांची बंदी घातली आहे.

  • Nikita Raut Doping Test: डोपिंग चाचणीत दोषी आढळल्यामुळे नाडाने आंतरराष्ट्रीय धावपटू निकिता राऊतवर तीन वर्षांची बंदी घातली आहे.

Nikita Raut Banned For 3 Years: आंतरराष्ट्रीय धावपटू निकिता राऊतवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली. डोपिंग चाचणीत दोषी आढळल्यानंतर नॅशनल अँटी डोपिंग असोसिएशनने म्हणजेच नाडाने रविवारी ही कारवाई केली आहे. यासंदर्भात एआययूला माहिती देम्यात आली आहे. निकिता ही नागपूर शहरातील तिसरी खेळाडू आहे, जी डोपिंग चाचणीत दोषी आढळली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या २५ वर्षीय निकिताने गेल्या वर्षी बेंगळुरू येथे झालेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये महिलांच्या ५००० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. यानंतर नाडाने तिची डोपिंग चाचणी केली. या चाचणीत तिने 19 नॉएड्रोस्टेरोन हे प्रतिबंधित अॅनाबॉलिक स्टेरॉईड घेतल्याचे आढळून आले. या पदार्थावर इंटरनॅशनल अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनने ३० वर्षांसाठी बंदी घातली आहे. हा पदार्थ प्रामुख्याने स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी वापरला जातो. यामुळे नाडाने रविवारी निकिताविरोधात कारवाई केली आहे. निकितावर येत्या २ मे २०२२ पासून ते १० जुलै २०२५ पर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

डोपिंग चाचणीचे नियम काय आहेत?

खेळाडूने कोणतेही उत्तेजक द्रव घेऊन खेळात सहभागी होऊ नये, प्रतिबंध केलेल्या औषधांचे सेवन करू नये. तसे आढळल्यास कारवाई होऊ शकते. डोपिंग समितीने चाचणीसाठी बोलावल्यास त्यांना नकार दिल्यास अशा खेळाडूवर कारवाई होऊ शकते.अधिकाऱ्यांनी वेळोवेळी औषधांच्या बाबतीत केलेल्या सुधारणा न पाळल्यास कारवाई होऊ शकते. डोपिंग समिती चाचणीला बोलावल्यावर हजर न झाल्यास कारवाई होऊ शकते.

विभाग

पुढील बातम्या