मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Neymar : दे मार! ब्राझीलचा फुटबॉल स्टार नेमार पुण्यात येणार? बालेवाडीत सामना रंगणार

Neymar : दे मार! ब्राझीलचा फुटबॉल स्टार नेमार पुण्यात येणार? बालेवाडीत सामना रंगणार

Aug 24, 2023, 05:44 PM IST

  • Neymar in AFC Champions League : ब्राझीलचा फुटबॉल स्टार नेमार लवकरच पुण्यात येत असून त्याचा खेळ पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.

Neymar set to play in pune

Neymar in AFC Champions League : ब्राझीलचा फुटबॉल स्टार नेमार लवकरच पुण्यात येत असून त्याचा खेळ पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.

  • Neymar in AFC Champions League : ब्राझीलचा फुटबॉल स्टार नेमार लवकरच पुण्यात येत असून त्याचा खेळ पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.

Neymar set to play in India : भारतात क्रिकेटची क्रेझ असली तरी जगाचं पहिलं प्रेम फुटबॉल आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळंच पेले, मॅराडोना, रोनाल्डो, मेस्सी, नेमार या स्टार फुटबॉलपटूंची नावं माहीत नसलेला क्रीडाप्रेमी सापडणार नाही. टीव्हीवर दिसणारे हे स्टार प्रत्यक्षात पाहायला मिळणं दुर्मिळच. हा दुर्मिळ योग लवकरच जुळून येतोय.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार लवकरच पुण्यात येणार आहे. इतकंच नव्हे तर त्याला फुटबॉल खेळताना पाहण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळण्याची दाट शक्यता आहे. नेमारनं अलीकडंच पीएसजी हा कल्ब सोडून अल - हिलाल या क्लबशी करार केला आहे. हा क्लब आणि भारतातील मुंबई सिटी एफसी हा क्लब एशियन फुटबॉल क्लब चॅम्पियन्स लीग स्पर्धेत एकाच ग्रुप डी मध्ये आहेत. त्यामुळं मुंबई सिटी एफसी विरुद्धचा सामना खेळण्यासाठी नेमार भारतात येण्याची शक्यता आहे. मुंबई सिटी एफसीचा सामना श्री शिवछत्रपती बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या त्यांच्या होमग्राऊंडवर होणार आहे. पुणेकरांबरोबरच महाराष्ट्रातील फुटबॉलप्रेमींना नेमारला खेळताना पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

Wrestling Federation India : भारताच्या कुस्ती क्षेत्राला मोठा हादरा; कुस्ती महासंघाचं सदस्यत्व रद्द

एएफसी चॅम्पियन्स लीग ही स्पर्धा आशियातील अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा समजली जाते. या स्पर्धेत खेळणाऱ्या संघाचे गट आज क्वालालंपुरमध्ये करण्यात आली. वेस्ट झोनमधील ग्रुप डीमध्ये मुंबई सिटी एफसीला ग्रुप डीमध्ये स्थान मिळालं. त्याच गटात अल हिलाल, इराणचा एफसी नासाझी मझांदरन व उझबेकिस्तानच्या नवबाहोर या क्लबचा समावेश आहे.

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो हा देखील पुण्यात खेळायला येईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र रोनाल्डोचा क्लब अल - नासरचा ई गटात समावेश झाला आहे. त्यामुळं त्याची पुणेवारी हुकली आहे.

एशियन चॅम्पियन्स लीग स्पर्धेतील गटनिहाय साखळी सामने १८ सप्टेंबपरासून सुरू होणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात एकूण दहा गटांमध्ये साखळी सामने रंगणार आहेत. स्पर्धेचे अंतिम वेळापत्रक अद्याप ठरलेले नाही. त्यामुळं नेमारच्या क्लबचा सामना नेमका कधी होणार आहे याची तारीख अद्याप कळलेलं नाही.

विभाग

पुढील बातम्या