मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Kane Williamson : विल्यमसनने सुरू केली बॅटिंग प्रॅक्टिस, टीम इंडियाला वर्ल्डकपमधून बाहेर काढण्याची तयारी?

Kane Williamson : विल्यमसनने सुरू केली बॅटिंग प्रॅक्टिस, टीम इंडियाला वर्ल्डकपमधून बाहेर काढण्याची तयारी?

Aug 04, 2023, 04:48 PM IST

    • Kane Williamson Batting Practice : विश्वचषक २०२३ पूर्वी न्यूझीलंडसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा स्टार फलंदाज केन विल्यमसनने नेट प्रॅक्टिस सुरू केली आहे.
Kane Williamson Batting Practice

Kane Williamson Batting Practice : विश्वचषक २०२३ पूर्वी न्यूझीलंडसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा स्टार फलंदाज केन विल्यमसनने नेट प्रॅक्टिस सुरू केली आहे.

    • Kane Williamson Batting Practice : विश्वचषक २०२३ पूर्वी न्यूझीलंडसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा स्टार फलंदाज केन विल्यमसनने नेट प्रॅक्टिस सुरू केली आहे.

Kane Williamson Started Batting Practice In Nets : वनडे वर्लडकप 2023 आधी न्यूझीलंड क्रिकेटला मोठा दिलासा मिळाला आहे. संघाचा स्टार फलंदाज आणि कर्णधार केन विल्यमसनने नेटमध्ये फलंदाजीचा सराव सुरू केला आहे. विल्यमसनला IPL 2023 च्या पहिल्या सामन्यात दुखापत झाली होती. तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर होता. आता विल्यमसनने स्वत: त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो फलंदाजी करताना दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

भारतात खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकात विल्यमसन न्यूझीलंडसाठी सर्वात महत्त्वाचा घटक ठरू शकतो. विल्यमसनने व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, "काही चेंडू खेळण्यासाठी बॅट घेऊन नेटमध्ये परतल्याने खूप चांगले वाटले." विलियम्सन नेटमध्ये शॉट्स खेळत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याच्या बॅटमधून काही सुंदर शॉट्सही दिसले.

विल्यमसनचे चाहते आनंदी

विल्यमसनला नेटमध्ये फलंदाजी करताना पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. व्हिडिओवर कमेंट करताना, एका युजरने लिहिले की, "ओएमजी! तुला परत पाहून खूप आनंद झाला. दुसर्‍या यूजरने लिहिले, "कमबॅक चॅम्प." आणखी एका यूजरने लिहिले की, "वर्ल्ड कप येतोय ना, त्यामुळे केन भैया तयारी करत आहे."

भारतासाठी न्यूझीलंडचा संघ धोकादायक

ICC च्या स्पर्धांमध्ये केन विल्यमसनचा संघ भारतासाठी अडचणी निर्माण करतो, हे अनेक आयसीसी इव्हेंट्समध्ये दिसून आले आहे.

वनडे वर्ल्डकपमध्ये भारत आणि न्यूझीलंडचे संघ ९ वेळा आमनेसामने आले आहेत. या ९ पैकी ५ सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत. तसेच, टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि न्यूझीलंड ३ वेळा आमने सामने आले आहेत. तीन पैकी तिन्ही सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत. सोबतच WTC फायनलमध्ये न्यूझीलंडने विराट कोहलीच्या टीम इंडियाला धूळ चारली होती. विशेष म्हणजे टीम इंडियाला २०१९ च्या वनडे वर्ल्डकपमधून न्यूझीलंडनेच बाहेर काढले होते.

IPL सामन्यात झाली होती दुखापत

केन विल्यमसनला IPL 2023 साठी गुजरात टायटन्सने आपल्या संघाचा भाग बनवले होते. मात्र चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान त्याला दुखापत झाली होती. कॅच पकडताना विल्यमसनच्या पायाला दुखापत झाली होती.

विल्यमसनची आतापर्यंतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

केन विल्यमसनने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ९४ कसोटी, १६१ एकदिवसीय आणि ८७ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने १६४ कसोटी डावांमध्ये ५४.८६ च्या सरासरीने ८१२४ धावा, १५३ एकदिवसीय डावांमध्ये ४७.८५ च्या सरासरीने ६५५५ धावा आणि ८५ T20 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये २४६७ धावा केल्या आहेत.

पुढील बातम्या