मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Neeraj Chopra Wins Diamond league : नीरज चोप्राची कमाल, विश्वविजेत्या अँडरसन पीटर्सला हरवून दोहा डायमंड लीग जिंकली

Neeraj Chopra Wins Diamond league : नीरज चोप्राची कमाल, विश्वविजेत्या अँडरसन पीटर्सला हरवून दोहा डायमंड लीग जिंकली

May 05, 2023, 11:40 PM IST

    • Neeraj Chopra won the Diamond League 2023 : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने दोहा डायमंड लीगचे जेतेपद पटकावले आहे. त्याने पहिल्याच प्रयत्नात ८८.६७ मीटर लांब भालाफेक करून स्पर्धा जिंकली. 
Neeraj Chopra Wins Doha Diamond league

Neeraj Chopra won the Diamond League 2023 : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने दोहा डायमंड लीगचे जेतेपद पटकावले आहे. त्याने पहिल्याच प्रयत्नात ८८.६७ मीटर लांब भालाफेक करून स्पर्धा जिंकली.

    • Neeraj Chopra won the Diamond League 2023 : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने दोहा डायमंड लीगचे जेतेपद पटकावले आहे. त्याने पहिल्याच प्रयत्नात ८८.६७ मीटर लांब भालाफेक करून स्पर्धा जिंकली. 

Neeraj Chopra won the Diamond League 2023 : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने शनिवारी (४ एप्रिल) रात्री दोहा डायमंड लीगचे विजेतेपद पटकावले आहे. या विजेतेपदासह नीरजने या मोसमाची शानदार सुरुवात केली आहे. नीरजने या स्पर्धेत ८८.६७ मीटर लांब भाला फेकून स्पर्धा जिंकली. नीरजने गेल्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अँडरसन पीटर्सकडून झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला आहे. पीटर्सने या स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

दोहाच्या कतार स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या या स्पर्धेत नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८८.६७ मीटर भालाफेक केली. या स्पर्धेत टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारा चेक रिपल्बिकचा भालाफेकपटू जेकोब वडलेच दुसऱ्या स्थानावर राहिला. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने तिसरे स्थान पटकावले. गेल्या वर्षीच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अँडरसन पीटर्सने नीरज चोप्राचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले होते.

दोहा डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राची कामगिरी

पहिला प्रयत्न - ८८.६७ मी

दुसरा प्रयत्न - ८६.०४ मी

तिसरा प्रयत्न - ८५.४७ मी

चौथा प्रयत्न - x

पाचवा प्रयत्न - ८४.३७ मी

सहावा प्रयत्न - ८६.५२ मी

दोहा डायमंड लीगची अंतिम स्थिती

१) नीरज चोप्रा (भारत) - ८८.६७ मी

२) जाकुब वडलेच (चेक प्रजासत्ताक) - ८८.६३ मी

३) अँडरसन पीटर्स (ग्रेनाडा) - ८५.८८ मी

४) ज्युलियन वेबर (जर्मनी) - ८२.६२  मी

५) अँड्रियन मार्डेरे (मोल्दोव्हा) - ८१.६७ मी

६) केशॉर्न वॉलकॉट (त्रिनिदाद आणि टोबॅगो) - ८१.२७ मी.

७) रॉडरिक जी. डीन (जपान) -७९.४४ मी

८) कर्टिस थॉम्पसन (यूएसए) - ७४.१३ मी

यूजीनमध्ये होणार डायमंड लीगची अंतिम फेरी 

दोहा येथे झालेला हा इव्हेंट डायमंड लीगचा पहिला टप्पा आहे. १६ आणि १७ सप्टेंबर रोजी यूजीनमध्ये (Eugene) डायमंड लीगची फायनल होणार आहे. डायमंड लीगच्या एका लेगमध्ये प्रत्येक खेळाडूला प्रथम क्रमांकासाठी ८, द्वितीय क्रमांकासाठी ७, तृतीय क्रमांकासाठी ६ तर चौथ्या क्रमांकासाठी ५ गुण दिले जातात.

नीरज सध्याचा डायमंड लीग चॅम्पियन

नीरजची वैयक्तिक सर्वोत्कृष्ट कामगिरी ८९.९४ मीटर आहे. हा राष्ट्रीय विक्रमही आहे. त्याने २०१८ दोहा डायमंड लीगमध्ये चौथे स्थान पटकावले होते. त्याने त्यावर्षी ८७.४३m भाला फेकला होता. तर फिटनेसमुळे नसल्यामुळे नीरजला गेल्या वर्षी दोहा डायमंड लीगमध्ये भाग घेता आला नव्हता.

पुढील बातम्या