मराठी बातम्या  /  क्रीडा  /  नीरज चोप्राची फायनल मॅच! भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरू होणार? लाईव्ह कुठे पाहणार? जाणून घ्या

नीरज चोप्राची फायनल मॅच! भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरू होणार? लाईव्ह कुठे पाहणार? जाणून घ्या

Aug 26, 2023, 06:48 PM IST

    • Neeraj Chopra Javelin World Athletics Championships : ऑलिम्पिक, आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ आणि डायमंड लीगमध्ये चॅम्पियन बनलेल्या नीरजला केवळ जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकता आलेले नाही. नीरज रविवारी सुवर्ण जिंकण्याच्या इराद्याने मैदानावर उतरणार आहे.
Neeraj Chopra World Athletics Championships (AFP)

Neeraj Chopra Javelin World Athletics Championships : ऑलिम्पिक, आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ आणि डायमंड लीगमध्ये चॅम्पियन बनलेल्या नीरजला केवळ जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकता आलेले नाही. नीरज रविवारी सुवर्ण जिंकण्याच्या इराद्याने मैदानावर उतरणार आहे.

    • Neeraj Chopra Javelin World Athletics Championships : ऑलिम्पिक, आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ आणि डायमंड लीगमध्ये चॅम्पियन बनलेल्या नीरजला केवळ जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकता आलेले नाही. नीरज रविवारी सुवर्ण जिंकण्याच्या इराद्याने मैदानावर उतरणार आहे.

Neeraj Chopra World Athletics Championships final : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकण्याच्या मार्गावर आहे. नीरज रविवारी (२७ ऑगस्ट) अंतिम फेरीत खेळणार आहे. या स्पर्धेत नीरजची नजर पहिल्या वहिल्या सुवर्णपदकावर असेल. 

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

नीरज चोप्रा फायनल खेळणार

ऑलिम्पिक, आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ आणि डायमंड लीगमध्ये चॅम्पियन बनलेल्या नीरजला केवळ जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकता आलेले नाही. नीरज रविवारी सुवर्ण जिंकण्याच्या इराद्याने मैदानावर उतरणार आहे.

तत्पूर्वी, नीरज चोप्राने शुक्रवारी (२५ ऑगस्ट) एकाच थ्रोमध्ये या वर्ल्ड चॅम्पियशीपची फायनल आणि पॅरिस ऑलिम्पिकचे तिकिट तिकीट काढले. नीरजसह किशोर जेना आणि डीपी मनू यांनीही भालाफेकीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक अ‍ॅथलेटिक्समध्ये एकाच स्पर्धेत तीन भारतीयांनी एकत्र अंतिम फेरी गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे. नीरजने पहिल्या थ्रोमध्ये ८८.७७ मीटर भालाफेक केली. ही त्याची मोसमातील सर्वोत्तम कामगिरी आहे.

नीरज चोप्राच्या सामन्याची वेळ काय?

जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील भालाफेकीची अंतिम फेरी २७ ऑगस्टला (रविवार) होणार आहे. वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे सुरू आहे. बुडापेस्टला येथील नॅशनल अ‍ॅथलेटिक सेंटर येथे भालाफेकीचा अंतिम सामना रंगणार आहे. नीरजा चोप्राचा इव्हेंट भारतीय वेळेनुसार रात्री ११:४५ वाजता सुरू होईल.

भालाफेकीची फायनल लाईव्ह कुठे पाहणार?

जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील भालाफेकीचा अंतिम सामना भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनेलवर थेट प्रसारित केला जाणार नाही. मात्र, आपण नीरज चोप्राचा सामना ऑनलाइन पाहू शकतो. चाहते जिओ सिनेमाच्या अ‍ॅप आणि वेबसाइटवर नीरज चोप्राचा इव्हेंट लाईव्ह पाहू शकतात.

पुढील बातम्या