मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Neeraj Chopra : नीरजच्या एका हाकेवर धावत आला पाकचा अर्शद नदीम, मित्रांनी तिरंग्यासह केलं फोटोसेशन

Neeraj Chopra : नीरजच्या एका हाकेवर धावत आला पाकचा अर्शद नदीम, मित्रांनी तिरंग्यासह केलं फोटोसेशन

Aug 28, 2023, 01:43 PM IST

  • Neeraj Chopra and Arshad Nadeem : सुवर्ण जिंकल्यानंतर नीरज चोप्राने पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीमला पोडियमवर बोलावलं, तेव्हा तोही धावत आला. दोघांनी एकत्र फोटो सेशन केले. या क्षणाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. त्यांच्या या मैत्रीपूर्ण वागणुकीचे सर्वजण कौतुक करत आहेत.

Neeraj Chopra and Arshad Nadeem

Neeraj Chopra and Arshad Nadeem : सुवर्ण जिंकल्यानंतर नीरज चोप्राने पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीमला पोडियमवर बोलावलं, तेव्हा तोही धावत आला. दोघांनी एकत्र फोटो सेशन केले. या क्षणाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. त्यांच्या या मैत्रीपूर्ण वागणुकीचे सर्वजण कौतुक करत आहेत.

  • Neeraj Chopra and Arshad Nadeem : सुवर्ण जिंकल्यानंतर नीरज चोप्राने पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीमला पोडियमवर बोलावलं, तेव्हा तोही धावत आला. दोघांनी एकत्र फोटो सेशन केले. या क्षणाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. त्यांच्या या मैत्रीपूर्ण वागणुकीचे सर्वजण कौतुक करत आहेत.

Neeraj Chopra and Arshad Nadeem World Athletics Championship : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने इतिहास रचला. त्याने वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. यानंतर पोडियमवर तिरंगा फडकावला गेला आणि राष्ट्रगीत झाले. नीरज चोप्रा आणि संपूर्ण भारतीय चमू जल्लोष करत होता. तेवढ्यात कॅमेरामनची नजर एका प्रसंगावर पडली, हा प्रसंग पाहून चाहत्यांच्या मनात नीरज चोप्राबद्दलचा आदर आणखी वाढला.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

वास्तिवक, नीरजने फोटोसेशनसाठी कट्टर प्रतिस्पर्धी आणि या स्पर्धेतील रौप्यपदक विजेता अर्शद नदीमला पोडियम बोलावले. अर्शद नदीम पाकिस्तानचा स्टार भालाफेकपटू आहे. नीरजने हाक देताच अर्शददेखील क्षणाचाही विलंब न करता धावत पोडियमवर आला आणि दोघांनी तिरंग्यासह फोटो सेशन केले.

अर्शद नदीम नीरज चोप्राच्या एका हाकेवर धावत आला, जणू तो या कॉलचीच वाट पाहत होता. दोघांनीही कॅमेऱ्यासमोर पोज दिली आणि यातून सांगितले की, दोन्ही बाजूंनी प्रयत्न केले तर प्रेम आणि मैत्रीचा संदेशही देता येतो.

यानंतर दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर तुफन व्हायरल झाला. या फोटोत गंमतीची गोष्ट म्हणजे नीरजच्या हातात तिरंगा आहे, तर त्याच्या खांद्याला खांदा लावून अर्शद नदीम आनंदाने उड्या मारताना दिसत आहे.

दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमध्‍ये नीरजच्‍या भाला हातात घेतल्याने अर्शद नदीम वादात सापडला होता, त्यावेळी नीरजने त्याला मोठ्या मनाने साथ दिली आणि त्याच्या बचाव केला होता.

PCB ने केले अर्शद नदीमचं कौतुक

वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये अर्शद नदीमने रौप्य पदक जिंकले. यानंतर त्याने त्याच्या सोशल मीडियवरही नीरज सोबतचा एक अप्रतिम क्षण शेअर केला. नदीमला त्याच्या कामगिरीबद्दल प्रशंसा मिळत आहे. कमी सुविधा असतानाही त्याने रौप्यपदक जिंकले आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही अर्शद नदीमचे कौतुक केले आहे. त्यांनी ट्वीटरवर लिहिले की, "आमच्या मुलतान स्टार अर्शद नदीमला सपोर्ट करा. जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानसाठी पहिले पदक जिंकल्याने देशाला तुझा अभिमान आहे.

तर नीरज चोप्रानेही भारतासाठी ऐतिहासिक पहिले सुवर्णपदक जिंकले हे विशेष. गेल्या काही महिन्यांपासून दुखापतींनी त्रस्त असलेल्या नीरज चोप्राने हंगेरीच्या राजधानीत दुसऱ्या प्रयत्नात ८८.१७ च्या थ्रोसह स्पर्धेत प्रवेश केला. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ८७.८२ च्या थ्रोसह रौप्यपदक जिंकले, हे त्याच्या देशासाठी पहिले जागतिक चॅम्पियनशिप पदक आहे, तर झेक प्रजासत्ताकच्या याकूब वडलेजने गेल्या वर्षी ओरेगॉनमध्ये ८६.६७ थ्रोसह जिंकलेले कांस्यपदक कायम ठेवले.

पुढील बातम्या