मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Tilak Varma Batting : झोपतानाही बॅट-बॉल शेजारी ठेवायचा; तिलक वर्माच्या वडिलांनी सांगितले पोराच्या क्रिकेटवेडाचे किस्से

Tilak Varma Batting : झोपतानाही बॅट-बॉल शेजारी ठेवायचा; तिलक वर्माच्या वडिलांनी सांगितले पोराच्या क्रिकेटवेडाचे किस्से

Aug 09, 2023, 09:41 AM IST

    • West Indies vs India 2023 : डावखुऱ्या तिलक वर्माने टीम इंडियात जोरदार पदार्पण केलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या दोन्ही सामन्यात तिलकने विंडिजच्या गोलंदाजांना चोपून काढलं आहे.
Tilak Verma In West Indies vs India 2023 (HT)

West Indies vs India 2023 : डावखुऱ्या तिलक वर्माने टीम इंडियात जोरदार पदार्पण केलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या दोन्ही सामन्यात तिलकने विंडिजच्या गोलंदाजांना चोपून काढलं आहे.

    • West Indies vs India 2023 : डावखुऱ्या तिलक वर्माने टीम इंडियात जोरदार पदार्पण केलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या दोन्ही सामन्यात तिलकने विंडिजच्या गोलंदाजांना चोपून काढलं आहे.

Tilak Verma In West Indies vs India 2023 : यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या तिलक वर्माला टीम इंडियाची जर्सी मिळाली आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या गेल्या दोन टी-२० सामन्यात तिलम वर्माने कमीत कमी चेंडूत जास्तीत जास्त धावा करत योगदान देण्याचा प्रयत्न केला. परंतु दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा पराभव झाला. त्यानंतर आता तिलक वर्माच्या धमाकेदार खेळीमुळं तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने विंडिजचा पराभव करत मालिकेतील आव्हान जिवंत ठेवलं आहे. त्यामुळं आता संपूर्ण टी-२० मालिकेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या तिलक वर्माचं अनेकांनी कौतुक करत तो पुढच्या काळात युवराज सिंह याची भूमिका पार पाडणार असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय आगामी विश्वचषकापूर्वी भारताला धडाकेबाज फलंदाज मिळाल्याने चाहत्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

तिलम वर्माने विंडिजच्या गोलंदाजांची धुलाई केल्यानंतर त्याचे वडील नंबूरी नागराजू यांनी मोठा खुलासा केला आहे. तिलकचे वडील नंबूरी नागराजू हे इलेक्ट्रिशियनचं काम करतात. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना नंबूरी नागराजू म्हणाले की, तिलक वर्माला बालपणापासून क्रिकेटची आवड आहे. नेहमी हातात बॅट घेऊन तो क्रिकेटमध्ये नाव मोठं करण्याचं स्पप्नं पाहिलं होतं. तो लहान असताना आम्ही त्याला प्लास्टिकची बॅट खरेदी करून दिली. त्यानंतर तिलक झोपताना बॅट आणि बॉल शेजारी ठेवत असायचा, असं तिलकचे वडील नंबूरी नागराजू यांनी म्हटलं आहे. याशिवाय प्रतिभा, कठोर परिश्रम आणि कुटुंबाच्या अतुलनीय पाठिंब्याच्या जोरावर तिलकने मोठं यश मिळवल्याचंही नागराजू यांनी म्हटलं आहे.

तिलक वर्माला मिळालेल्या यशामागे बालपणीचे प्रशिक्षक सलाम बायश यांचा हात असल्याचंही नागराजू यांनी म्हटलं आहे. सलाम सर हे तिलक वर्माला गॉडफादरसारखे आहे. क्रिकेटच्या गोष्टी, किट आणि अन्य बाबींमध्ये त्यांनी नेहमीच तिलकला मदत केल्याचं नागराजू यांनी सांगितलं आहे. सलाम सरांनी तिलकला नेहमीच प्रोत्साहन देण्याचं काम केलं. क्रिकेट खेळत असताना त्यांनी तिलकला अभ्यासातही मागे पडू दिलं नाही. ज्यावेळी त्याला पैशांची आवश्यकता होती, ती देखील सलाम सरांनी पूर्ण केली. त्यामुळं सलाम सरांच्या मार्गदर्शनाखाली तिलक वर्मा देशाचं नाव आणखी मोठं करणार असल्याचा विश्वास त्याचे वडील नागराजू यांनी व्यक्त केला आहे.

पुढील बातम्या