मराठी बातम्या  /  क्रीडा  /  WATCH : सिराज, उमरानचा कपाळावर टिळा लावून घेण्यास नकार; सोशल मीडियावर होतायंत ट्रोल

WATCH : सिराज, उमरानचा कपाळावर टिळा लावून घेण्यास नकार; सोशल मीडियावर होतायंत ट्रोल

Feb 04, 2023, 12:46 PM IST

    • umran malik mohammed siraj new controversy: भारताने टी-20 मालिकेत न्यूझीलंडचा २-१ असा पराभव केला. आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील पहिला सामना ९ फेब्रुवारीपासून नागपुरात खेळवला जाणार आहे.
umran malik mohammed siraj

umran malik mohammed siraj new controversy: भारताने टी-20 मालिकेत न्यूझीलंडचा २-१ असा पराभव केला. आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील पहिला सामना ९ फेब्रुवारीपासून नागपुरात खेळवला जाणार आहे.

    • umran malik mohammed siraj new controversy: भारताने टी-20 मालिकेत न्यूझीलंडचा २-१ असा पराभव केला. आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील पहिला सामना ९ फेब्रुवारीपासून नागपुरात खेळवला जाणार आहे.

india vs australia test series : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ४ सामन्यांची कसोटी मालिका (IND vs AUS) ९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ नागपुरात पोहोचला आहे. दुसरीकडे, कांगारू संघ बेंगळुरूमध्ये घाम गाळत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

दरम्यान, भारतीय संघाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौरपासून ते वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमध्ये भारतीय क्रिकेटपटू उमरान मलिक, मोहम्मद सिराज आणि विक्रम राठौर यांनी कपाळावर कुंकवाचा टिळा लावून घेण्यास नकार दिला. या दोघांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचे स्वागत हसून स्वीकारले परंतु कपाळावर टिळा लावू नका असा हाताने इशारा केला. यानंतर अनेकजण सिराज-उमरानवर प्रश्न उपस्थित करत आहेत, तर काही लोक असेही म्हणत आहेत की या दोघांशिवाय इतर अनेकांनीही टिळा लावून घेतला नाही. अशा स्थितीत असे प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे.

सिराच-उमरानची शानदार कामगिरी

मोहम्मद सिराजने गेल्या वर्षभरात अप्रतिम कामगिरी केली आहे. अलीकडेच त्याने न्यूझीलंडविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. तो सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये नंबर वन गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. दुसरीकडे, उमरान मलिक १५० किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. भारतीय संघातही त्याला सातत्याने संधी मिळत आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका भारतासाठी महत्त्वाची आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनची फायनल गाठण्यासाठी भारताला ही कसोटी मालिका जिंकावीच लागणार आहे.

पुढील बातम्या