मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Mohammed Siraj: मिलरला बाद करता आलं नाही, सिराजनं अंपायरवर काढला राग

Mohammed Siraj: मिलरला बाद करता आलं नाही, सिराजनं अंपायरवर काढला राग

Oct 10, 2022, 10:47 AM IST

    • Mohammed Siraj- IND vs SA 2nd odi: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना भारताने ७ गडी राखून जिंकला. आफ्रिकेने भारतासमोर २७९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताने तीन विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
Mohammed Siraj

Mohammed Siraj- IND vs SA 2nd odi: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना भारताने ७ गडी राखून जिंकला. आफ्रिकेने भारतासमोर २७९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताने तीन विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.

    • Mohammed Siraj- IND vs SA 2nd odi: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना भारताने ७ गडी राखून जिंकला. आफ्रिकेने भारतासमोर २७९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताने तीन विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजसाठी रांची येथील एकदिवसीय सामना शानदार ठरला. सिराजने भारतीय गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करताना १० षटकांत केवळ ३८ धावा दिल्या आणि ३ बळी घेतले. यामुळेच भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेला ५० षटकांत ७ बाद २७८ धावांवर रोखता आले. पण या सामन्यादरम्यान एक विचित्र प्रसंग घडला. यानंतर सिराजने पंचांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

सिराजने ४८व्या षटकात काय केले

वास्तविक, ही घटना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीदरम्यान ४८व्या षटकात घडली. सिराजच्या या षटकातील दुसऱ्या चेंडूवर केशव महाराजने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो चुकला आणि चेंडू थेट यष्टिरक्षक संजू सॅमसनच्या हातात गेला. त्यानंतर संजूने लगेच चेंडू सिराजच्या दिशेने फेकला. जेव्हा चेंडू सिराजकडे आला तेव्हा दुसऱ्या एंडला डेव्हिड मिलर क्रीझच्या बाहेर होता. तो धावबाद होऊ शकतो याची जाणीव मिलरला नव्हती.

अशा स्थितीत सिराजने चाणाक्षपणा दाखवला आणि हळू हळू स्टंपच्या दिशेने सरकायला सुरुवात केली. यानंतर सिराजने स्टंपवर थ्रो मारला पण चेंडू स्टंपला स्पर्श करू शकला नाही आणि सीमारेषेबाहेर गेला. सिराजने चाणाक्षपणा दाखवला पण तरीही मिलरच्या निष्काळजीपणाचा तो फायदा उठवू शकला नाही.

उलट भारतीय संघालाच ४ धावांचे नुकसान झाले. यानंतर अंपायरने आफ्रिकन संघाला ४ अतिरिक्त धावा दिल्या. या प्रसंगानंतर सिराज संतापलेला दिसला. त्याने पंचाशी वाद घालण्यास सुरुवात केली. पण, पंचांनी आपला निर्णय बदलला नाही.

कारण सिराजचा थ्रो स्टंपला लागला असता तर डेव्हिड मिलरला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले असते. यामुळेच अंपायरने ओव्हरथ्रो म्हणून ४ धावा देण्याचा निर्णय घेतला.

टीम इंडियाने सामना ७ विकेटने जिंकला

दरम्यान, टीम इंडियाने रांची वनडे ७ विकेटने जिंकला. रीझा हेंड्रिक्स (७४) आणि एडन मार्करम (७९) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर आफ्रिकेने निर्धारित ५० षटकांत ७ गडी गमावून २७८ धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने आपले पहिले दोन विकेट लवकर गमावल्यानंतर इशान किशन (९३) आणि श्रेयस अय्यर (११३) यांच्या उत्कृष्ट खेळीमुळे लक्ष्य सहज गाठले. सध्या ही तीन सामन्यांची वनडे मालिका १-१ अशी बरोबरीत आली आहे. आता मालिकेतील शेवटचा सामना निर्णायक ठरणार आहे.

पुढील बातम्या